शाहिद कपूरचं नाव हिंदी चित्रपटसृष्टीतील गुणी अभिनेत्यांमध्ये यादीत घेतलं जातं. नुकताच त्याचा तेरी बातों में ऐसा उल्झा जिया चित्रपट रिलीज झाला. या चित्रपटातील त्याचा अभिनय त्याच्या चाहत्यांना खूप आवडला. या चित्रपटानंतर तो रोशन एंड्रयूजच्या देवा या चित्रपटात दिसणार आहे. दरम्यान, आता त्याच्या नव्या चित्रपटाचीही घोषणा करण्यात आली आहे.
[read_also content=”‘कांगुवा’चा दमदार टीझर रिलीज,सूर्याची भेदक नजर अन् बॉबी देओलचा भयानक अवतार; पाहून अंगावर येईल काटा! https://www.navarashtra.com/movies/kanguva-teaser-out-suriya-disha-patani-bobby-deol-siva-film-release-date-will-be-reveals-soon-nrps-516785.html”]
शाहिद लवकरच ‘अश्वत्थामा’ चित्रपटात मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात तो गुरू द्रोणाचार्यांचा मुलगा अश्वत्थामाच्या भूमिकेत दिसणार आहे. मंगळवारी अॅमेझॅान प्राइम इव्हेंटमध्ये निर्मात्यांनी या संर्दर्भात सांगितलं. शाहिद कपूरनेही सोशल मीडियावर याची माहिती दिली आहे.
‘अश्वत्थामा’चे दिग्दर्शन सचिन रवी करणार आहेत. या चित्रपटाची कथाही त्यांनी लिहिली आहे. वाशू भगनानी, जॅकी भगनानी आणि दीपशिखा देशमुख यांची निर्मिती आहे. या चित्रपटाचे निर्माते उत्तम शैलीत चित्रीकरण करण्याचा प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात येत आहे. निर्मात्यांच्या म्हणण्यानुसार, प्रेक्षकांनी याआधी पडद्यावर असे काही अनुभवले नसेल अशा पद्धतीने ते चित्रित करण्याची योजना आहे. माहितीनुसार, हा हिंदीसोबत तामिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये रिलीज होणार आहे.