शेफाली जरीवालाचे निधन (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
इंडस्ट्रीमधून एक दुःखद बातमी आली आहे. मॉडेल आणि अभिनेत्री शेफाली जरीवालाचे निधन झाले आहे. अनेक माध्यमांनी तिच्या मृत्यूबद्दल दावा केला आहे. व्हायरल स्टेटमेंटच्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये शेफालीच्या मृत्यूची माहिती देखील शेअर करण्यात आली आहे. शेफाली मुंबईतील अंधेरी लोखंडवाला भागात राहत होती. अचानक रात्री ११ वाजण्याच्या सुमारास तिने छातीत दुखण्याची तक्रार केली. तिचा पती पराग त्यागी तिला जवळच्या रुग्णालयात घेऊन गेला असता डॉक्टरांनी उपचार सुरू करण्यापूर्वी तिला मृत घोषित केले. तथापि, अभिनेत्रीच्या मृत्यूबद्दल अधिक माहिती आणि कुटुंबाकडून अधिकृत निवेदनाची वाट पाहत आहे. ‘कांटा लगा गर्ल’ म्हणून प्रसिद्ध असलेली शेफाली ४२ वर्षांची होती. तिने ‘मुझसे शादी करोंगी’ चित्रपटात अक्षय कुमार आणि सलमान खानसोबत काम केले होते.
पोस्ट व्हायरल
विकी लालवाणी यांच्या पोस्टचा हवाला देत व्हायरल झालेल्या विधानात म्हटले आहे की, शेफालीला तिच्या पती आणि इतर तिघांनी बेलेव्ह्यू मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये नेले. हॉस्पिटलमधील एका कर्मचाऱ्यांनी शेफालीचा रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच मृत्यू झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. या हॉस्पिटलचे डॉ. लुला यांनी हे वृत्त नाकारले नाही, फक्त ते कोणत्याही रुग्णाबद्दल कोणतीही माहिती देऊ शकत नाहीत असे सांगितले. त्यानंतर त्याच हॉस्पिटलचे डॉ. सुशांत यांनी या वृत्ताला दुजोरा देत म्हटले की, ‘आम्ही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी कूपर हॉस्पिटलमध्ये पाठवत आहोत.’
अखेर रणदीप हुड्डाचे स्वप्न झाले पूर्ण; अभिनेत्याने खरेदी केले आलिशान घर, किंमत जाणून व्हाल चकीत
विकीची पोस्ट
चाहत्यांना धक्का
शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. शेफालीने लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस 13 मध्येही भाग घेतला होता. तिच्या डान्ससाठीही ती चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होती. शेफाली जरीवालाच्या मृत्यूच्या बातमीने चाहत्यांना धक्का बसला आहे. शेफालीने लोकप्रिय रियालिटी शो बिग बॉस 13 मध्येही भाग घेतला होता. तिच्या डान्ससाठीही ती चाहत्यांमध्ये खूप लोकप्रिय होती. इतकंच नाही तर याच शो चा विजेता सिद्धार्थ शुक्लाचेही वयाच्या 40 व्या वर्षी निधन झाले होते आणि शेफाली आणि सिद्धार्थ यांच्यात खूपच चांगली मैत्री होती
पती परागचा व्हिडिओ व्हायरल
शेफालीच्या मृत्यूच्या बातमीनंतर, तिचा पती परागचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो गाडीत बसलेला दिसत आहे. या व्हिडिओमध्ये पराग खूप दुःखी दिसत आहे. या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये, शेफालीच्या मृत्यूच्या बातमीने युजर्सनाही धक्का बसला आहे. युजर्सनी अभिनेत्रीच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे.
पिंगा गर्ल्सला मिळणार नवा चॅलेंज, वल्लरीच्या सासुबाईंचा कसा करणार सामना?
परागचा व्हिडिओ