मंडप सजलाय आणि कियाराच्या हातावर मेहंदीही काढण्यात आली आहे. बॉलीवूडचे लव्ह बर्ड्स सिद्धार्थ मल्होत्रा (Siddharth Malhotra) आणि कियारा अडवाणी (Kiara Advani) सप्तपदी घेतील त्या क्षणाची सगळेजण आतुरतेने वाट बघत आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नासाठी जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसला अक्षरश: एखाद्या नवरीसारखं सजवण्यात आलं आहे. याच शाही महालामध्ये सिद्धार्थ आणि कियारा आज लग्न करुन आयुष्यातल्या नव्या टप्प्याची सुरुवात करतील.
Haldi Today ?#SidharthMalhotra#SidKiaraWedding#KiaraSidharthwedding#SidharthKiaraWedding#KiaraAdvani pic.twitter.com/FH1q0tAbuI — Ayush (@Ayushh_11) February 7, 2023
लग्नाचा मुहूर्त
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीच्या लग्नाची चाहते आतुरतेने वाट बघत आहेत. उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सिद्धार्थ आणि कियाराच्या लग्नाचे विधी दुपारी 3 वाजता सुरु होणार आहेत.
हळदी समारंभ
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आज विवाह बंधनात अडकणार आहेत. लग्नाआधी त्यांच्या हळदीचे विधी होणार आहेत. सिद्धार्थ आणि कियाराच्या हळदी समारंभाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यात सुर्यगढ पॅलेस हळदीच्या रंगात रंगलेला दिसत आहे. पिवळ्या रंग लक्षात घेऊन सजावट करण्यात आली आहे.आज दोघांना हळद लावली जाईल. हळदीनंतर लग्नाचे विधी आणि मग ग्रँड रिसेप्शन पार्टीदेखील होणार आहे.
सोमवारी संगीत फंक्शनच्या आधी सिद्धार्थ आणि कियारा यांचा रोका झाला. कियाराला लग्नाचा चुडा घालण्यात आला. दोघांच्या कुटंबातले लोक आणि जवळचे मित्रमैत्रिणी यावेळी उपस्थित होते. लग्नातली प्रत्येक गोष्ट खास ठेवण्यात आली आहे. मेन्यूपासून व्हेन्यूपर्यंत प्रत्येक गोष्टीकडे बारकाईने लक्ष देण्यात आलं आहे.
गुलाबी रंगात न्हाऊन निघाला सुर्यगढ पॅलेस
सिद्धार्थ आणि कियारा यांच्या लग्नाआधी 6 फेब्रुवारीला मेहंदी आणि संगीत सोहळा झाला. संगीत नाईटसाठी सुर्यगढ पॅलेसवर गुलाबी रंगाची रोषणाई करण्यात आली होती. गुलाबी रंगात सजलेल्या सुर्यगढ पॅलेसचे काही फोटो व्हायरल झाले आहेत.