(फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम)
ड्युटीवरून ‘बिग बॉस’च्या घरात राडा
बिग बॉसच्या घरात कामाच्या वाटपावरून नेहमीच वाद होत असताना दिसले आहे, मात्र यंदा हे वाद टोकाला गेले आहेत. प्रोमोमध्ये प्राजक्ता आणि अनुश्री एकमेकींवर कडक शब्दात टीका करताना दिसत आहेत. अनुश्रीचे म्हणणे आहे, “आम्ही ड्युटी नाही करणार,” अशा भूमिकेपासून सुरू झाले हा वाद. त्यावर प्राजक्ता म्हणते, काय ‘मूर्ख आहे यार… आणि त्यावर अनुश्री म्हणते, हो मूर्ख आहे आम्ही, तुझ्यासारखे …प्राजक्ताने हे जाऊन दीपालीला सांगितले आणि मग दीपाली अनुश्रीची विचारणा करायला गार्डन एरियामध्ये येते, काय ग तू शिव्या देतेस?
त्यावर अनुश्री पुन्हा प्राजक्ताला म्हणते, आईला घेऊन आलीस तू ? प्राजक्ता म्हणते, अक्कल आहे का तुला? बावळट… इतकेच नाही तर, वादाच्या ओघात काही अश्या गोष्टी बोलल्या गेल्या ज्यमुळे घरातील वातावरण अधिकच तापले आहे. घरातील सदस्यांमधील हे वाद प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहेत. “ह्याला प्रेम म्हणा नाहीतर वेड, चकवा देणार यंदाचा खेळ” या रितेश भाऊंच्या ओळींप्रमाणेच घरातील हा ‘चकवा’ प्रेक्षकांना खिळवून ठेवत आहे.
‘कौन है ये अंकल…’ , Shahrukh Khan चा हा अपमान की कौतुक? चाहत्यांनी व्यक्त केला संताप
तसेच आजच्या भागात बिग बॉस मराठीच्या घरात आज एक टास्क पार पडणार आहे. राशनच्या गोण्यांसाठी घरातील सदस्यांमध्ये दमदार राडा झाल्याचे पाहायला मिळणार आहे. आज घरात राशन मिळवण्यासाठी टास्क पार पडणार आहे. या टास्कमध्ये स्पर्धकांना जास्तीत जास्त राशनच्या गोण्या जमा करायच्या आहेत. या टास्कमध्ये जी टीम विजेता होईल त्यांना गोल्डन राशन कार्ड मिळणार आहे.






