बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खानने (Shahrukh Khan) आपल्या अभिनयाने सर्वांना वेड लावलंय. गेल्या काही दिवसांपासून, शाहरुख खानच्या डंकीनंतर पुढे काय ? याविषयी चर्चा सुरु होती. अखेर त्याच्या पुढच्या एका प्रोजेक्टविषयी माहिती मिळाली आहे. शाहरुख खान लेक सुहाना खानसोबत (Suhana Khan Debut) मोठ्या पडद्यावर झळकणार असल्याची माहिती मिळाली आहे. (Bollywood News)
सुहाना खान शाहरुख खानसोबत मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. रेड चिलीस निर्मित आणि सिद्धार्थ मॅरफ्लिक्ससह हा चित्रपट पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे.
किंग खानच्या या चित्रपटाचे दिग्दर्शन सुजोय घोष करणार आहे. सुजोय घोष हे ‘कहानी’, ‘कहानी २’, ‘बदला’ या चित्रपटांसाठी प्रसिद्ध आहे. याआधीही शाहरुख खान आणि सुजोय घोष यांनी एकत्र काम केलं आहे. सुजोय घोष दिग्दर्शित ‘बदला’ चित्रपटाची निर्मिती शाहरुख खानने केली होती. ही जोडी आता पुन्हा नवीन प्रोजेक्ट घेऊन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आली नाही. सुजोय घोषही नवीन शैलीत काम करण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं जात आहे.
रेड चिलीस आणि मॅरफ्लिक्सबद्दल अशी माहिती समोर येत आहे की, शाहरुख खान हा असा निर्माता आहे की ज्याला आंतरराष्ट्रीय चित्रपटाशी स्पर्धा करायला आवडते. तर सिद्धार्थ आनंद हा साहसी दृश्य असलेल्या चित्रपटांसाठी ओळखला जातो. शाहरुख खान आणि सिद्धार्थ आनंद ॲक्शन चित्रपटाची एकत्र निर्मिती करणार आहेत. त्यामुळे हा चित्रपट एक अविस्मरणीय अनुभव असणार, यात वादच नाही.
सुहाना खानचे पदार्पण
सुहाना खान या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण करणार आहे. यााधी झोया अख्तरच्या ‘द आर्चिस’ या चित्रपटातून ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित चित्रपटात शाहरुख खानची भूमिका आणि स्क्रीनटाइम हा डिअर जिंदगीवर आधारित असण्याची शक्यता आहे. चित्रपटाचे लेखन सुरू असून फायनल पॉलिशिंग बाकी आहे. चित्रपटाचे प्री-प्रॉडक्शनल जोमात सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. रेड चिलीस् शाहरुख खानच्या नव्या पिढीला प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सज्ज असल्याचं सांगितलं जात आहे. शाहरुख-सुहाना व्यतिरिक्त या चित्रपटात आणखी कोण असणार हे अजून सांगण्यात आलेलं नाही.
चित्रपटाचे दिग्दर्शक सुजोयने यांनी ‘बदला’ चित्रपटात अमिताभ बच्चन आणि तापसी पन्नूसोबत काम केले आहे. हा चित्रपट हिट ठरला तेव्हापासूनच शाहरूख खान सुजोयच्या संपर्कात होता. शाहरुख खानच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर, 2024 मध्ये पुन्हा सिद्धार्थ आनंदसोबत काम करायला शाहरुख खान सज्ज आहे. ‘टायगर’ आणि ‘पठान’नंतर आता शाहरुखचा नवीन सिनेमा पुढच्या वर्षी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.