तब्बल 200 कोटी मनी लाँड्रिंग प्रकरणात (Money Laundering Case) आरोपी सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekar) तिहार तुरुंगात आहे. या प्रकरणात गेल्या काही महिन्यांपासून अनेक नवनवे खुलासे होत आहेत. अनेक बॉलिवूड अभिनेत्रींशी सुकेशचे प्रेमसंबंध असल्याचं उघड झालं होतं. त्याने खूप महागडे गिफ्ट देऊन तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढल्याचं म्हटलं जात आहे. यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिससह (Jacqueline Fernandez) नोरा फतेहीचा समावेश असल्याची चर्चा आहे.
[read_also content=”होळीला घरी जायचं आहे का ? मध्य रेल्वेने सुरु केल्यात 90 स्पेशल गाड्या, वाचा सगळी माहिती एका क्लिकवर https://www.navarashtra.com/maharashtra/holi-special-trains-2023-railway-started-90-holi-special-trains-nrsr-372064.html”]
या खंडणी प्रकरणात जॅकलिनचाही सहभाग आहे का ? याचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी काही दिवसांपूर्वी जॅकलिनला समन्स बजावला होता. तसेच तिला या प्रकरणात सुनावणीसाठी न्यायालयातही हजर राहावं लागलं होतं. यावेळी तिने सुकेश चंद्रशेखर विरोधात जबाब दिला होता. या संपूर्ण घडामोडीनंतर आरोपी सुकेशचं एक नवीन विधान समोर आलं आहे.
आरोपी सुकेश चंद्रशेखर याने शुक्रवारी सांगितले की, जॅकलिन फर्नांडिजचा 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात सहभाग नव्हता. तिला काळजी करण्याची काहीही गरज नाही. कारण तिचं रक्षण करण्यासाठी मी इथे आहे, असं विधान सुकेश चंद्रशेखर याने केलं आहे. आरोपी सुकेश याला नुकतंच दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात हजर करण्यात आलं होतं. यावेळी त्यानं हे विधान केलं आहे.