taarak mehta ka ooltah chashmah babita ji and jethalal exit show
‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या टेलिव्हिजन शोचे फक्त देशातच नाही तर, जगभरामध्ये मोठ्या प्रमाणावर चाहते आहेत. शोमुळे त्यातील कलाकारांनाही मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळालेली आहे. मालिकेतील कलाकार कायमच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता अशातच जेठालालचं पात्र साकारणारे, दिलीप जोशी आणि बबिता जीचं पात्र साकारणारी मुनमुन दत्ता ही देखील चर्चेत आली आहे. हे पात्र कायमच प्रेक्षकांना त्यांच्या गोड नात्यांमुळे विशेष भावतं. सध्या मालिकेमध्ये सुरु असलेल्या ट्रॅकमध्ये प्रेक्षकांची आवडती जोडी दिसत नसल्यामुळे चाहते अस्वस्थ झाले.
Squid Game 3: शेवटच्या सीझनमध्ये उलघडणार ‘हे’ ५ रहस्य, Netflix वर रिलीज होताच ट्रेंडिंगवर
शोच्या कथानकात ‘जेठालाल’ आणि ‘बबिता जी’ हे दोन आवडते कलाकार दिसत नसल्यामुळे त्यांनी हा लोकप्रिय शो सोडला का? असे प्रश्न सध्या चाहते उपस्थित करताना दिसत आहेत. मालिकेला तब्बल १७ वर्षे झाले आहेत. तेव्हापासून ते दोघेही मालिकेमध्ये प्रमुख भूमिकेत असून ते तेव्हापासून चाहत्यांचं निखळ मनोरंजन करताना दिसत आहेत. सध्या मालिकेमध्ये सुरु असलेल्या ट्रॅकमधील त्यांच्या अनुपस्थितीमुळे बर्याच चर्चा होताना पाहायला मिळत आहेत. बर्याच वर्षांपासून प्रेक्षकांचे मनोरंजन केल्यावर ही जोडी शोमधून बाहेर पडण्याचा विचार करीत आहे, असा अंदाज वर्तवला जात आहे. सध्या मालिकेमध्ये निर्मात्यांनी ‘भूतनी’चा ट्रॅक पुन्हा तयार केला आहे.
‘Umrao Jaan’ चित्रपटापासून प्रेरित होता ‘Heeramandi’ ? स्वतःच मुझफ्फर अली यांनी केला खुलासा
सध्याच्या ट्रॅकमध्ये, तारक मेहताचा बॉस त्याला आणि त्याची पत्नी अंजलीला ‘हॉलिडे होम’मध्ये एक सुंदर सुट्टीसाठी पाठवतात. तारक त्याच्या बॉसला गोकुलधाम सोसायटीच्या लोकांनाही त्यामध्ये घ्यायला परवानगी देण्यास सांगतो. त्याच्या कामामुळे आणि कंपनीच्या नफ्यावर बॉस खूश असतो. त्यामुळे, तारकचा बॉस त्याच्यासोबत सहमत होतो. परंतु तारक आणि गोकुलधाम सोसायटीच्या सदस्यांना हे माहित नसतं की, ‘हॉलिडे होम’मध्ये भूत आहे आणि तारकच्या बॉसने त्यांना या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी तिथे त्याला पाठवलेले असते. सध्याच्या कथेत सुरू असलेल्या भयानक कथानका दरम्यान, नेटकऱ्यांनी ‘जेठालाल’ आणि ‘बबिता जी’ची अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे.
‘Umrao Jaan’च्या स्क्रीनिंगदरम्यान रेखाचा हटके अंदाज, पापाराझींना दिली पोझ; चाहत्यांनी केले कौतुक
खरंतर, तनुज महाशब्देचे अय्यर हे पात्र सध्याच्या ट्रॅकमधूनही गहाळ आहे. त्याच्या अनुपस्थितीत एक चर्चा झाली की दिलीप जोशी आणि मुनमुन दत्ता कदाचित या शोच्या बाहेर गेले असतील. एबीपीच्या अहवालानुसार, शोच्या प्रॉडक्शन हाऊसने पुष्टी केली आहे की, बबिता ही भूमिका साकारणारी मुनमुन दत्ता अजूनही या शोचा एक भाग आहे. कथा अशा प्रकारे दर्शविली गेली आहे की ‘जेठालाल’ व्यवसायाच्या कामातून बाहेर आहे आणि ‘बबिता’ आणि ‘अय्यर’ महाबळेश्वरमध्ये सुट्टीवर गेले आहेत.
‘Sitaare Zameen Par’ सहाव्या दिवशीही १०० कोटींच्या कमाईपासून दूर, ‘Kuberaa’ च्याही कमाईत घट
तारक मेहता का उल्टा चष्मा (TMKOC) हा शो २८ जुलै २००८ रोजी सोनी सब या टेलिव्हिजन चॅनलवर टेलिकास्ट झाला आणि तेव्हापासून तो प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय होताना दिसत आहे. ह्या शोची शुटिंग मुंबईमध्ये केली जाते. गोकुळधाम सोसायटीमध्ये देशातल्या विविध कानाकोपऱ्यतले लोकं राहताना दिसतात. जिथे प्रेक्षकांना अनेक संस्कृतींचे लोक एकत्र आलेले दिसतील. या टीव्ही सीरियलचे आतापर्यंत ३,८०० हून अधिक भाग टेलिकास्ट झाले आहेत.