(फोटो सौजन्य - x अकाउंट)
‘उमराव जान’ हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित होणार आहे आणि त्याआधी मुंबईत त्याचे खास स्क्रिनिंग आयोजित करण्यात आले होते. या प्रसंगी चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री रेखा यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. अभिनेत्रीने तिच्या नृत्याने सर्वांना आश्चर्यचकित केलेच नाही तर अनिल कपूर यांना रेड कार्पेटवर सोबत थिरकण्यास भाग पाडले.
‘उमराव जान’च्या स्क्रिनिंगमध्ये रेखा नाचताना दिसली
१९८१ च्या या क्लासिक चित्रपटाचे स्क्रिनिंग गुरुवारी रात्री मुंबईत झाले. हा चित्रपट २७ जूनपासून पुन्हा चित्रपटगृहात दाखवला जाणार आहे. रेखा या कार्यक्रमात एका सुंदर हस्तिदंती आणि सोनेरी ड्रेसमध्ये पोहोचल्या होत्या, ज्यामध्ये अभिनेत्रीची ‘उमराव जान’ स्टाईल स्पष्ट दिसत होती. रेखाच्या पोशाखावर बारीक भरतकाम आणि पारंपारिक दागिन्यांची झलक दिसून आली. रेखाच्या या कार्यक्रमाचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओमध्ये रेखा चित्रपटातील तिच्या लोकप्रिय डान्स स्टेप्स करताना दिसत आहे.
‘Sitaare Zameen Par’ सहाव्या दिवशीही १०० कोटींच्या कमाईपासून दूर, ‘Kuberaa’ च्याही कमाईत घट
दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये, अनिल कपूर प्रथम अभिनेत्रीला नमस्कार करून स्वागत करतात, नंतर तिला मिठी मारतात आणि रेखा त्यांना तिच्यासोबत नाचण्यासाठी त्यांना फिरवते. रेखा रेड कार्पेटवर ए.आर. रहमानलाही भेटताना दिसत आहे, जिथे दोघांनी मजा केली आणि सेल्फी काढले. अभिनेत्रीच्या ‘उमराव जान’च्या स्क्रिनिंग दरम्यानचे सगळे फोटो आता व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
दिलजीत दोसांझवर निशाणा साधल्यानंतर, गायक गुरू रंधावाने उचलले हे पाऊल; एक्स अकाउंट केले बंद
‘उमराव जान’ चित्रपटाबद्दल
‘उमराव जान’ नुकतेच राष्ट्रीय चित्रपट विकास महामंडळ आणि राष्ट्रीय चित्रपट अभिलेखागारांनी राष्ट्रीय चित्रपट वारसा अभियानांतर्गत रिस्टोर केले आहे. हा चित्रपट १९ व्या शतकातील लखनौच्या कथेवर आधारित आहे, ज्यामध्ये अमीरन नावाच्या एका मुलीची कथा दाखवण्यात आली आहे, जी एका वेश्यालयात पोहोचते आणि ती तीन पुरुषांशी संबंध निर्माण करते. हा चित्रपट रेखाच्या कारकिर्दीतील सर्वोत्तम चित्रपटांपैकी एक मानला जातो आणि त्याचे दिग्दर्शन मुझफ्फर अली यांनी केले होते.