Tapu Sonu Marriage Track Disappoints Taarak Mehta Ka Ooltah Chashmah Fans
गेले १५ वर्षांहून अधिक काळ प्रेक्षकांचं सलग कॉमेडी करणाऱ्या ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या कॉमेडी शोवर सध्या सोशल मीडियावरून चांगलीच टीका केली जात आहे. शोच्या ट्रॅकवर प्रेक्षक सध्या नाराज आहेत. सध्या मालिकेमध्ये, गोकुळधाम सोसायटीचे सेक्रेटरी आत्माराम तुकाराम भिडेची लेक सोनूचे (सोनालिका) तिच्या इच्छेविरुद्ध लग्न केले जात आहे. अलिकडच्या एपिसोडनंतर, काही प्रेक्षकांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली. टप्पू (Nitish Bhaluni) आणि सोनू (Khushi Mali) यांच्या विभक्त होण्याच्या कहाणीमुळे ते आपली नाराजी व्यक्त करत आहेत. वर्षानुवर्षे प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणाऱ्या या मालिकेच्या विचित्र कथानकामुळे नेटकरी कमालीचे निराश झाले असून आता ते संतापले आहेत.
लोक स्पष्टपणे म्हणू लागले आहेत की निर्मात्यांनी एक चांगला शो खराब केला आहे. येत्या एपिसोडमध्ये पिंकू, गोली आणि गोगी क्लब हाऊसमध्ये टप्पूला सांगणार आहेत की, सोनूने अभिनवसोबत साखरपुडा केला आहे तेव्हा टप्पूसह संपूर्ण गोकुळधाम सोसायटीतील लोकांना मोठा धक्का बसेल. हा तोच मुलगा आहे, जो अलीकडेच सोनूच्या घरी लग्नाची बोलणी करण्यासाठी आला होता.
दुसरीकडे, टप्पू सेनाला अशी चिंता सतावत आहे की, हे लग्न रोखण्यासाठी लवकर पाऊले उचलली नाहीतर सोनू अभिनवसोबत लग्न करुन गोकुळधाम सोसायटी सोडून कायमची निघून जाईल. दरम्यान, जेव्हा टप्पू काहीतरी करण्याच्या उद्देशाने क्लब हाऊसमधून बाहेर पडतो, तेव्हा तो सोनूला अभिनवसोबत गाडीत बसताना पाहतो, पण गाडी चालू होताच, सोनू टप्पूला खुणावून सांगते की, तिला हे लग्न करायचे नाही. हे पाहून टप्पू वेळ न दवडता गाडीच्या मागे धावतो.
त्या सीनच्या वेळी लागलेलं हे गाणं लोकांना आवडत नाहीये. मालिकेचा बदलता ट्रॅक पाहता सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी मालिकेवर आणि मालिकेच्या निर्मात्यांवर स्पष्टपणे नाराजी दाखवत आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून नेटकरी तुफान ट्रोल करीत आहेत. एका युजरने या ट्रॅकची खिल्ली उडवत लिहिले की, ‘ते पोपटलालचे लग्न करू शकले नाहीत आणि आता ते मुलांचे लग्न लावत आहेत.’ दुसऱ्या एका युजरने कमेंट केलीये की, ‘ही मालिका सासू आणि सुनेचा विषारीपणा टाळण्यासाठी बनवण्यात आली होती पण इथेही तेच सुरू झाले आहे.’ तर आणखी एका युजरने कमेंट केलीये की, ‘आता हेच पाहायचे बाकी होतं,’, ‘खरंतर, ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ हा शो खूप वर्षांपूर्वीच संपला आहे, आता हे लोक फक्त पैसे कमवण्याच्या नादी लागले आहेत.’, ‘या कॉमेडी शोऐवजी अनुपमा पाहावी. अनुपमा मालिका पाहणे केव्हाही चांगले, या शोमध्ये आता पाहण्यासारखे काहीही उरले नाही.’
Kutumb Kirtan: प्रशांत दामले रंगमंचावर पुन्हा एकदा धमाल करणार, कोरं करकरीत नाटक येतंय, कधी अन् कुठे?
अनेक युजर्सचे तर असं मत आहे की, हा शो पूर्वी कॉमेडी शो म्हणून तरी वाटत होता, आता तर कोणत्याही एपिसोडमध्ये असे वाटतंही नाही. ते पूर्वीसारखे मजेदार सीन्स कुठेही राहिले नाही आणि ही मालिका आता पूर्वीसारखी केव्हाही होऊ शकत नाही. दरम्यान, ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ हा शो बऱ्याच काळापासून नकारात्मक कारणांमुळे चर्चेत आहे. हा शो सोडलेल्या अनेक कलाकारांनी निर्माते असित मोदी यांच्यावर कामाचे वाईट वातावरण निर्माण करण्याचा आणि थकबाकी न भरण्याचा आरोप केला आहे. लोकांनी म्हटले आहे की आता हा शो आदराने आणि शिष्टाचाराने बंद करावा, अन्यथा तो जबरदस्तीने बंद करावा लागेल.