काही दिवसापुर्वी मोठा गाजावाजा करत नेटफ्लिक्सन कपील शर्माच्या शोची (The Kapil Sharma Show) घोषणा केली होती. टिव्हीवरील प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्या गाजवल्यानंतर आता ओटीटीवरही हा कार्यक्रम कमालच करेल असा अंदाज लावला जात होता. पण हाच फाजील आत्मविश्वास नेटफ्लिक्सला नडला असल्याचं सध्या दिसत आहे. कपिल शर्माची जादू OTT वर अजिबात चालली नाही आहे. Netflix ने पहिला भाग प्रसारित झाल्यानंतर पाच आठवड्यांच्या आत शो संपवण्याचा निर्णय घेतला. शोच्या शेवटच्या एपिसोडचे शूटिंग पूर्ण झाले असून मिळालेल्या रिपोर्टनुसार, या पाच एपिसोड्समध्येच नेटफ्लिक्सने कपिल शर्मावर जवळपास 25 कोटी रुपये खर्च केले आहेत.
[read_also content=”या आठवड्यात OTT वर पाहा अजय देवगण-आर माधवनचा ‘शैतान’, या दिवशी होणार रिलीज! https://www.navarashtra.com/movies/ajay-devgan-r-madhvan-starrer-shaitaan-will-release-on-netflix-nrps-529429.html”]
स्टँड-अप कॉमेडियन बनलेला शो होस्ट आणि नंतर प्रोग्राम निर्माता कपिल शर्माचा OTT वरील कार्यक्रम फ्लॅाप झाला आहे. नेटफ्लिक्सने त्याचा नवीन शो ‘द ग्रेट इंडियन कपिल शो’ बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. ओटीटीच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, त्याचा शेवटचा एपिसोड शूट झाला आहे आणि त्यानंतरच शोचा सेट हटवण्याचे काम सुरू झाले आहे.
रिपोर्टनुसार, कपिल शर्माला प्रति शो 5 कोटी रुपये मानधन मिळाले आहे, तर शोचा सर्वाधिक प्रशंसनीय अभिनेता सनी ग्रोव्हरला प्रति एपिसोड केवळ 25 लाख रुपये मानधन मिळाले आहे. तर, अर्चना पूरण सिंगला फक्त सोफ्यावर बसून हसण्यासाठी प्रति एपिसोड 10 लाख रुपये मानधन दिले जात असल्याच्या वृत्ताने सध्या खळबळ उडवून दिली आहे.