प्रसिद्ध बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जोहर आता पडद्यावर एक नवीन प्रेमकथा सादर करणार आहे. आज म्हणजेच 22 फेब्रुवारी रोजी दिग्दर्शकाने सोशल मीडियावर आपल्या नवीन चित्रपटाची घोषणा केली आहे.
करण जोहरने केली आगामी चित्रपटाची घोषणा
करणने त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक छोटासा व्हिडिओ शेअर केला असून त्याची तारीखही जाहीर केली आहे. ‘सनी संस्कार की तुलसी कुमारी’ असे या चित्रपटाचे नाव आहे, ज्यामध्ये जान्हवी कपूर आणि वरुण धवनची जोडी पुन्हा एकदा धमाल करताना दिसणार आहे.
वरुण-जान्हवीची जोडी पुन्हा करणार धमाल
हा व्हिडिओ शेअर करताना करणने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘तुमचा सनी संस्कारी त्याची तुलसी कुमारी शोधण्याच्या मार्गावर आहे. मनोरंजनाने भरलेली ही प्रेमकहाणी मोठ्या पडद्यावर येत आहे. ‘है…’ हा चित्रपट पुढच्या वर्षी ८ एप्रिलला थिएटरमध्ये दाखल होणार आहे. याआधी वरुण आणि जान्हवी शेवटचे ‘बावल’ चित्रपटात दिसले होते. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. ही जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती.
वरुणने करण जोहरच्या ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून करिअरची सुरुवात केली होती. यानंतर दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले. यामध्ये ‘हम्प्टी शर्मा की दुल्हनिया’, ‘बद्रीनाथ की दुल्हनिया’, ‘जुग जुग जिओ’ सारख्या हिट चित्रपटांच्या नावांचा समावेश आहे.