काही दिवसांपूर्वी अभिनेत्री समांथा रुथ प्रभूनं मायोसायटिस (Myositis) या आजाराने ग्रस्त असल्याची माहिती दिली होती. आता बॉलिवूडमधीलअभिनेता वरुण धवननं (Varun Dhawan) आपल्या आजाराविषयी सांगितलं आहे.
[read_also content=”आजारपणावर मात केल्यानंतर डॉ. विलास उजवणेंचं ‘कुलस्वामिनी’ चित्रपटाद्वारे पुनरागमन https://www.navarashtra.com/movies/vilas-ujawane-comeback-via-kulswamini-movie-nrsr-342108.html”]
वरुणनं एका मुलाखतीमध्ये सांगितलं की, मला वेस्टिब्युलर हायपोफंक्शन (Vestibular Hypofunction) हा आजार झाला आहे. मी स्वत:वर खूप कामाचा दबाव निर्माण केला होता, ज्याचा मला त्रास होत आहे. यामुळेच मला वेस्टिब्युलर हायपोफंक्शनचा त्रास होत आहे.
वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा एक असा आजार आहे ज्यामध्ये मेंदूला संदेश पाठववणारा कानाचा भाग व्यवस्थित काम करत नाही. हा आजार कानाच्या आत एका भागात होतो, ज्याचा संपूर्ण शरीरावर परिणाम होतो. यामुळे शरीराचे संतुलन बिघडते.
खराब रक्ताभिसरण, संसर्ग, कानात कॅल्शियमचा अपव्यय यांमुळे वेस्टिब्युलर हायपोफंक्शन हा आजार होऊ शकतो. चक्कर येणे, कशावरही लक्ष न लागणे अशा प्रकारची अनेक प्रकारची लक्षणे या आजाराची असू शकतात.