फोटो सौजन्य - सोशल मिडिया
India vs New Zealand 3rd ODI : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यामध्ये काल एकदिवसीय मालिकेचा शेवटचा सामना खेळवण्यात आला. या सामन्यामध्ये न्यूझीलंडच्या संघाने बाजी मारली. भारताचा न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा आणि निर्णायक एकदिवसीय सामना ४१ धावांनी हरला. या पराभवासोबतच टीम इंडियाने मालिकाही १-२ अशी गमावली. ३३८ धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाची आघाडीची फळी वाईटरित्या अपयशी ठरली. विराट कोहली वगळता कोणीही प्रभाव पाडू शकला नाही.
नितीश रेड्डी आणि हर्षित राणा यांनीही अर्धशतके झळकावली, परंतु तरीही टीम इंडिया विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचू शकली नाही. माजी निवडकर्ता कृष्णमाचारी श्रीकांत यांनी सामन्यादरम्यान एका खास क्षणाबद्दल सांगितले जेव्हा न्यूझीलंडच्या खेळाडूंचे पाय थरथर कापू लागले आणि त्यांचा कर्णधारही घाबरला. श्रीकांतने सुरुवात विराट कोहलीची प्रशंसा करून केली, त्याला “राजांचा राजा” असे संबोधले. त्यानंतर त्याने हर्षित राणाचे कौतुक केले आणि त्याला गेम-चेंजर म्हटले.
श्रीकांतने त्याच्या यूट्यूब चॅनलवर म्हटले आहे की, “विराट कोहली हा किंग्ज ऑफ किंग्स आहे. त्याला सलाम. किती शानदार खेळी! जर तुम्ही स्कोअरकार्ड आणि विकेट्स ज्या पद्धतीने पडत होत्या त्या पाहिल्या तर विकेट्स सतत पडत होत्या. धावसंख्या १/२८, २/४५, ३/६८ आणि ४/७१ होती. नितीश कुमार रेड्डी आला आणि त्याने डाव स्थिर केला आणि नंतर षटकार मारले. पण खरा सामना बदलणारा खेळाडू हर्षित राणा होता. राणा ज्या पद्धतीने फलंदाजी करत होता, त्यामुळे न्यूझीलंडचे खेळाडू थरथर कापत होते. राणाची फलंदाजी पाहून मी थक्क झालो आणि त्याने वेगळ्याच पातळीवर कामगिरी केली. ते अक्षरशः थरथर कापत होते आणि त्यांना काय करावे हे कळत नव्हते. तो कोणत्याही अडचणीशिवाय षटकार मारत होता आणि त्याची फलंदाजी जबरदस्त होती.”
He’s back in the hut, but a valiant knock under pressure by Harshit Rana. Well played!#TeamIndia #INDvNZ pic.twitter.com/b9N1nSPMtL — BCCI (@BCCI) January 18, 2026
तो पुढे म्हणाला, “विराट कोहली आणि हर्षित राणा यांनी एकत्रितपणे केलेल्या ९९ धावांपैकी राणाने ५२ धावा केल्या. आवश्यक धावगती ११ पेक्षा जास्त असतानाही हे ५२ धावा खूप महत्त्वाच्या होत्या आणि कोहलीला आशा देत होत्या. राणाच्या आक्रमक फलंदाजीमुळे धावसंख्या १० पर्यंत खाली आली आणि न्यूझीलंड घाबरला. न्यूझीलंडचा कर्णधारही घाबरला.”






