अभिनेता रितेश देशमुख हा हिंदी तसेच मराठी चित्रपटातील एक प्रसिद्ध अभिनेता असून तो विविध कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो. गणेश चतुर्थीच्या मुहूर्तावर रितेश देशमुखने BMW iX ही लाल रंगाची इलेकट्रीक कार खरेदी केली. तिची सध्याची किंमत ही १. ४ कोटींच्या घरात आहे. रितेशच्या या नव्या कोऱ्या कारचा लुक पाहून सगळेच थक्क झाले होते. मात्र रितेश देशमुख हा गाड्यांचा चाहता असल्याने त्याने यापूर्वी देखील अनेक आलिशान गाड्या खरेदी केल्या आहेत. तेव्हा कार प्रेमी असलेल्या रितेश देशमुखच्या कार कलेक्शन बाबतची माहिती आम्ही तुमच्या करीता घेऊन आलो आहोत.
ऑडी क्यू ७ :
रितेश देशमुखची पत्नी जेनेलिया देशमुख ही अनेकदा त्यांच्या ‘ऑडी क्यू ७’ या आलिशान गाडीतून प्रवास करताना दिसते. या ऑडी क्यू ७ कारची किंमत सुमारे ८८ लाख रुपये इतकी आहे.
मर्सिडीज-बेंझ एस ३५० डी :
रितेश देशमुख हा गाड्यांचा चाहता असला तरी त्याला हायस्पीड गाड्यांपेक्षा गाडीतील कम्फर्ट अधिक महत्वाचा वाटतो असे त्याने एका मुलाखतीत सांगितले. ‘मर्सिडीज-बेंझ एस ३५० डी’ या गाडीतून रितेश अनेकदा प्रवास करताना दिसतो. मर्सिडीज-बेंझ एस ३५० डी या गाडीची किंमत सुमारे १. ९१ कोटी इतकी आहे
टेस्ला मॉडेल एक्स :
पत्नी जेनेलिया देशमुख हिने रितेशला त्याच्या ४० व्या वाढदिवशी ‘टेस्ला मॉडेल एक्स’ ही कर गिफ्ट केली होती. ही कर पूर्णपणे इलेकट्रीक असून ही कार त्याच्यात असलेल्या फिचरमुळे अधिक लोकप्रिय आहे. टेस्ला मॉडेल एक्स ही कार अद्याप भारतात लाँच झालेली नाही. आंतराष्ट्रीय बाजारपेठेत टेस्ला मॉडेल एक्स या कारची किंमत सुमारे ८९, ९९० डॉलर्स असून २०२३ रोजी ही कर भारतात लाँच होणार आहे. भारतात या कारची किंमत सुमारे २ कोटी इतकी असेल.
बेंटले मुल्साने :
बेंटले मुल्साने ही कार बॉलिवूड मधील काही मोजक्याच अभिनेत्यांकडे आहे. रितेश देशमुखच्या कार कलेक्शनमधील ही सर्वात महागडी कार असल्याची माहिती आहे. ‘बेंटले मुल्साने’ या कारची भारतातील किंमत सुमारे ५. ५६ कोटी इतकी आहे. अभिनेत्री जेनेलिया सोबत लग्न झाल्यानंतर रितेश देशमुखने याच कार मधून तिला त्याच्या घरी आणले होते. त्यामुळे ही कार रितेश देशमुखच्या फार पसंतीची आहे.
रेंज रोव्हर :
रितेश देशमुखकडे असलेल्या कार कलेक्शन पैकी अजून एक आलिशान कार म्हणजे ‘रेंज रोव्हर’. रेंज रोव्हर या कार मधून रितेश देशमुख अनेकदा आपल्या कुटुंब सोबत प्रवास करताना दिसतो. रितेश देशमुखची मुलं रिआन आणि राहील तसेच पत्नी जेनेलिया हे चौघे अनेकदा या कार मधून जाताना दिसतात. रेंज रोव्हर या कारची भारतातील किंमत सुमारे २ कोटी इतकी आहे.