फोटो सौजन्य: X.com
भारतीय बाजारात बाईकसोबतच स्कूटरला सुद्धा चांगली मागणी मिळते. बाईकपेक्षा स्कूटर चालवण्यात जास्त सोयीस्कर असतात. तसेच रहदारीत सुद्धा स्कूटर आरामात चालवता येते. ग्राहक देखील दुचाकी खरेदी करताना स्कूटरला जास्त प्राधान्य देत असतात.
स्कूटर म्हंटलं की अनेकांच्या नजरेसमोर दोन स्कूटर हमखास येतात. ते स्कूटर म्हणजे होंडा ॲक्टिव्हा आणि टीव्हीएस स्कूटर. भारतीय बाजारपेठेत हे दोन्ही स्कूटर सर्वाधिक विक्री होणारे 110 सीसी स्कूटर आहेत. दोन्हीही फॅमिली स्कूटर आहेत. दोन्हीही उत्तम फीचर्स आणि परफॉर्मन्सच्या उत्कृष्ट कॉम्बिनेशनसह ऑफर केल्या जातात. मात्र, तुमच्यासाठी कोणती स्कूटर सर्वोत्तम असेल, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
Honda Activa 6G चे डिझाइन बऱ्याच काळापासून लोकप्रिय आहे. त्यात मेटल पॅनल्स आणि स्मूथ लाइन्स आहेत, ज्यामुळे ती आकर्षक दिसते. तिच्या फ्रंट अॅप्रन आणि बॅजिंगवर क्रोम एलिमेंट्स आहेत, जे तिला प्रीमियम लूक देतात.
अखेर Maruti Victoris दणक्यात झाली लाँच, वेगवेगळ्या इंजिन ऑप्शनसह मिळेल हाय-फाय फीचर्स
टीव्हीएस ज्युपिटर 110 मध्ये उत्कृष्ट डिझाइन, एलईडी डीआरएल आणि क्रोम एलिमेंट्ससह अधिक फ्रेश लूक आहे. त्यात 12-इंच अलॉय व्हील्स देखील आहेत जे तिचा लूक आणखी चांगला बनवतात. ज्युपिटर अॅक्टिव्हापेक्षा अधिक आकर्षक रंग पर्यायांसह ऑफर केली जाते.
Honda Activa 6G मध्ये 110cc चे सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिलेले आहे. हे इंजिन 7.9PS ची पॉवर आणि 9.05Nm टॉर्क जनरेट करते. या इंजिनमध्ये अनेक वर्षांपासून मोठा बदल झालेला नाही, पण आता ते अधिक स्मूथ आणि कार्यक्षम झाले आहे.
TVS Jupiter 110 मध्ये 113.3cc चे सिंगल-सिलेंडर, एअर-कूल्ड इंजिन दिलेले आहे. हे इंजिन 7.9PS ची पॉवर जनरेट करते. मात्र नॉर्मल मोडमध्ये हे 9.2Nm टॉर्क देते आणि iGo असिस्ट सोबत जास्तीत जास्त 9.8Nm टॉर्क निर्माण करते.
Honda Activa 6G च्या बेस व्हेरिएंटमध्ये 12-इंच फ्रंट आणि 10-इंच रिअर स्टील व्हील दिलेले आहेत. टॉप-एंड H-Smart व्हेरिएंटमध्ये ह्याच साइजचे अलॉय व्हील्स मिळतात. या स्कूटरमध्ये दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक आणि CBS (Combined Braking System) दिलेले आहे. Activa मध्ये 18-लीटर चे अंडरसीट स्टोरेज आहे. टॉप व्हेरिएंटमध्ये 4.5-इंच TFT कन्सोल देण्यात आले आहे, ज्यामध्ये स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी, टर्न-बाय-टर्न नेव्हिगेशन आणि कीलेस इग्निशन सारखे फीचर्स उपलब्ध आहेत.
TVS Jupiter 110 मध्ये दोन्ही बाजूंना 12-इंच मोठे अलॉय व्हील्स दिलेले आहेत. टॉप व्हेरिएंटमध्ये फ्रंट डिस्क ब्रेक आहे, तर इतर व्हेरिएंटमध्ये ड्रम ब्रेक दिला जातो. यात 33-लीटरचे मोठे अंडरसीट स्टोरेज आणि समोर 2-लीटर स्टोरेज स्पेस मिळते. Jupiter च्या मिड आणि टॉप व्हेरिएंटमध्ये LCD कन्सोल आहे, जो स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी आणि नेव्हिगेशन सपोर्ट करतो. तसेच यात iGo Assist फीचर दिलेले आहे, जे अचानक एक्सिलरेशनवर इंजिनला बूस्ट देते.
Honda Activa आणि TVS Jupiter दोन्ही स्कूटर्समध्ये स्टील ट्यूब फ्रेम, टेलीस्कोपिक फोर्क आणि रिअर मोनोशॉक सस्पेन्शन दिलेले आहे, जे खराब रस्त्यांवरही आरामदायी राइड अनुभव देतात.
Honda Activa तीन व्हेरिएंट्समध्ये उपलब्ध आहे. यामध्ये Standard व्हेरिएंटची किंमत 81,045 रुपये , DLX व्हेरिएंटची किंमत 91,565 रुपये आणि Smart व्हेरिएंटची किंमत 95,567 रुपयांइतकी आहे. दुसरीकडे, TVS Jupiter देखील तीन व्हेरिएंट्समध्ये येते. यामध्ये Drum व्हेरिएंटची किंमत 80,961 रुपये, Drum SXC व्हेरिएंटची किंमत 90,111 रुपये आणि Disc SXC व्हेरिएंटची किंमत 93,911 रुपये इतकी ठेवली आहे.