(फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम)
आसाम सरकारच्या आदेशानुसार सोमवारी झुबीन गर्ग यांच्या मृतदेहावर दुसरे पोस्टमॉर्टेम करण्यात आले. हे पोस्टमॉर्टेम त्यांच्या अंतिम संस्काराच्या काही तास आधीच पार पडलं. झुबीन गर्ग यांच्या पार्थिवावर मंगळवारी 21 सप्टेंबरला कामरूप जिल्ह्यातील गुवाहाटीजवळ त्यांच्या गावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो चाहत्यांनी आणि कलाकारांनी त्यांना शेवटचा निरोप दिला. झुबीन यांचे शेवटचे दर्शन घेण्यासाठी गायकाच्या चाहत्यांनी रस्त्यावर गर्दी केल्याचं पाहायला मिळालं. झुबीन गर्ग यांचे पार्थिव सरुसुजाई स्टेडियममध्ये ठेवले गेले होते.
दिग्दर्शकानं ‘बाबुली’ समोर जोडले हात, कोट्यवधी कमवणाऱ्या दशावतारचा दुसऱ्या सोमवारी गल्ला किती?
गायक झुबीन गर्ग यांचे १९ सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डायव्हिंग अपघातात निधन झाले. ते ईशान्य भारत महोत्सवासाठी सिंगापूरमध्ये होते. त्यांच्या मृत्यूनंतर, महोत्सवाच्या आयोजकांनी एक निवेदन जारी केले की झुबीन गर्ग यांना स्कूबा डायव्हिंग करताना श्वास घेण्यास त्रास होत होता आणि त्यांना सिंगापूर जनरल हॉस्पिटलमध्ये नेण्यापूर्वी त्यांच्यावर सीपीआर करण्यात आला. त्यांच्या निधनानंतर काही माध्यमांनी दावा केला होता की, त्यांचा मृत्यू स्कुबा डायव्हिंग करताना अपघातामुळे झाला. मात्र, झुबीन यांच्या पत्नी गरिमा सैकिया गर्ग यांनी हे वृत्त स्पष्टपणे फेटाळलं आहे.
श्रीदेवींच्या साडीत जान्हवी कपूरचा ग्लॅमरस लुक, ‘होमबाउंड’च्या प्रीमियरमध्ये वेधलं लक्ष
झुबीन गर्ग यांच्या मृत्यूबाबत सिंगापूरमध्ये 19 सप्टेंबर रोजी प्राथमिक पोस्टमॉर्टेम करण्यात आलं होतं, ज्यात “बुडणं” हे मृत्यूचं कारण नमूद करण्यात आलं. मात्र, आसाममध्ये त्यांच्या मृत्यूभोवती संशय वाढू लागला आणि अखेर दुसरं पोस्टमॉर्टेम करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रसिद्ध गायक व संगीतकार झुबीन गर्ग यांच्या सिंगापूरमधील आकस्मिक मृत्यूनंतर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
त्यांच्या मृत्यूमागे घातपात किंवा सहकाऱ्यांची निष्काळजीपणा असल्याचा संशय चाहत्यांकडून व्यक्त केला जात आहे. झुबीन गर्ग यांचं निधन झाल्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांकडून तत्काल आणि पारदर्शक चौकशीची जोरदार मागणी करण्यात आली.या वाढत्या दबावामुळेच आसाम सरकारने दुसऱ्या पोस्टमॉर्टेमचा निर्णय घेतला. चाहत्यांनी सिंगापूरमधील ईशान्य भारत महोत्सवचे आयोजक श्यामकानू महंता, तसेच झुबीनचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा यांच्यावर निष्काळजीपणाचा आणि दुर्लक्षेचा आरोप केला आहे.या दोघांवर अनेक जिल्ह्यांमध्ये FIR दाखल करण्यात आले आहेत.
”झुबीन गर्ग यांच्या मृत्यूवरून राजकारण होऊ नये, अफवा पसरू नयेत, यासाठी आम्ही हा निर्णय घेतला. जनतेच्या मनात कोणताही शंका राहू नये, यासाठी ही प्रक्रिया आवश्यक होती,”असं मुख्यमंत्री सरमा म्हणाले आहेत.