मधुमेहात साखरेची पातळी झपाट्याने वाढू लागते. औषध आणि आहाराच्या मदतीने साखरेची पातळी नियंत्रित करावी लागते. त्यामुळे मधुमेही रुग्णाला त्याच्या आहाराकडे अधिक लक्ष द्यावे लागते. अनेक वेळा जाणूनबुजून किंवा नकळत मधुमेही रुग्ण चुकीच्या गोष्टींचे सेवन करतात, ज्यामुळे त्यांची साखरेची पातळी झपाट्याने वाढते. यामध्येच ड्रायफ्रूट्सचाही समावेश आहे. ड्रायफ्रूट्स आरोग्यासाठी उत्तम मानली जातात. हे जरी खरं असेल तरीही डायबिटीसच्या रुग्णांसाठी मात्र काही ड्रायफ्रूट्स हे त्रासदायक ठरतात. मधुमेही रुग्णांनी ४ ड्रायफ्रूट्स खाऊ नयेत. ही नक्की कोणती ड्रायफ्रूट्स आहेत याबाबत आपण अधिक माहिती आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांच्याकडून घेऊया (फोटो सौजन्य - iStock)
डायबिटीसच्या रुग्णांनी नक्की काय खावे आणि काय टाळावे हे सांगितले जाते. मात्र कोणत्या प्रकारची ड्रायफ्रूट्स खाऊ नयेत हेदेखील माहीत असायला हवे
खजूरचा ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त असतो. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी खजूर खाऊ नयेत. खजूरमध्ये नैसर्गिक साखरदेखील खूप जास्त प्रमाणात आढळते. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी याचे सेवन करणे टाळावे
अंजीराचे सेवन केल्याने रक्तातील साखरेची पातळी त्वरीत वाढू शकते. त्यामुळे डायबिटीसच्या रुग्णांनी अंजीराचे सेवन करणे मुख्यत्वे टाळावे
बेदाणे हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेत हे जरी खरे असले तरीही मधुमेही रुग्णांसाठी मात्र बेदाण्याचे सेवन करणे हे त्रासदायक ठरू शकते. बेदाणे वा मनुके खाण्याने रक्तातील साखरेची पातळी त्वरीत वाढते
अॅप्रिकोट ज्याला हिंदीमध्ये खुबानी असे म्हटलं जाते यामध्येही साखरेचे प्रमाण अधिक असून डायबिटीसच्या रुग्णांनी सुकवलेले अॅप्रिकोट अजिबात खाऊ नये
डायबिटीस जास्त प्रमाणात असेल तर यापैकी कोणत्याही ड्रायफ्रूट्सचे सेवन करणे हे तुमच्यासाठी फारच धोकादायक ठरू शकते. त्यामुळे हे ड्रायफ्रूट्स खाणे टाळावे