फळांचा रस आरोग्यासाठी फायदेशीर असतो. हे रस आवश्यक पोषण, जीवनसत्त्वे आणि खनिजे प्रदान करतात, जे शरीराच्या एकूण आरोग्यासाठी महत्वाचे आहेत. येथे काही फायदेशीर रसांचे प्रकार आम्ही सांगतोय. ज्यूस हे केवळ आरोग्यासाठीच फायदेशीर नसून ते शरीरातील पोषक तत्वांची कमतरता देखील पूर्ण करू शकतात. रस तुमच्यासाठी किती फायदेशीर आहे हे तुम्ही रस तयार करण्यासाठी कोणत्या भाज्या आणि फळे वापरत आहात यावर अवलंबून आहे. अनेक ज्युसमधून विटामिन सी अधिक प्रमाणात मिळते आणि याशिवाय याचा फायदा त्वचेसाठीही होतो. तुम्ही जर वयापेक्षा अधिक म्हातारे दिसत असाल तर अँटीएजिंग म्हणून तुम्ही काही ज्युसचा वापर आपल्या डाएटमध्ये करून घ्यायला हवा. जाणून घेऊया कोणते ज्युस आहेत (फोटो सौजन्य - iStock)
अनेकांचे वय चेहऱ्यावर लवकर दिसू लागते. कधी कधी लहान वय असूनही चेहऱ्यावर अधिक वय उमटून येते. पण तुम्हाला काही अँटीएजिंग ज्युस यासाठी फायदेशीर ठरू शकतात. कोणत्या ज्युसचा वापर करावा जाणून घ्या
नॅशनल सेंटर फॉर बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशननुसार, काही भाज्या किंवा फळांचा रस सेवन करणे खूप फायदेशीर मानले जाते. रसासाठी, आपण उच्च अँटिऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वे असलेली फळे आणि भाज्या निवडल्या पाहिजेत, जेणेकरून आपल्याला सर्व आवश्यक पोषक घटक मिळू शकतील
कोबीचा रस अनेक आरोग्य फायद्यांनी परिपूर्ण आहे. या रसामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते, जे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करते आणि संक्रमणाशी लढण्यास मदत करते. त्यात अँथोसायनिन्स आणि फायटोन्यूट्रिएंट्स नावाचे गुणधर्म असतात. या अँटिऑक्सिडंट्सची उपस्थिती शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून संरक्षण करण्यास मदत करते, ज्यामुळे वृद्धत्वाची प्रक्रिया मंद होऊ शकते
व्हिटॅमिन K च्या कमतरतेवर मात करण्यासाठी काकडीच्या रसाचे सेवन करणे देखील खूप फायदेशीर आहे. काकडी शरीरातील डिटॉक्सिफिकेशनमध्ये देखील मदत करू शकते. यासाठी पुदिना आणि लिंबू मिसळून काकडीचा रस वेगवेगळ्या प्रकारे तयार करता येतो
संत्र्याच्या रसामध्ये अँटिऑक्सिडंट्स असतात, जे शरीराला मुक्त रॅडिकल्सपासून वाचवतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते आणि संक्रमणांपासून संरक्षण होते. तुम्ही नाश्त्यामध्ये नियमित संत्र्याचा रस पित असाल तर तुमची त्वचा उत्तम राहते आणि वयही लवकर दिसून येत नाही
द्राक्षाच्या रसामध्ये रेझवेराट्रोल सारखे अँटीऑक्सिडंट असतात, जे शरीरातील मुक्त रॅडिकल्स कमी करतात आणि वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करतात. हा रस हृदयाच्या आरोग्याला चालना देतो, रक्तदाब नियंत्रित करतो आणि हृदयविकाराचा धोका कमी करतो. यामध्ये असलेले फायबर्स पचनक्रिया सुधारण्यास मदत करतात