जगात अनेक सुंदर ठिकाणे आहेत, ज्यांना भेट देण्यासाठी अनेक पर्यटक दूरदूरवरुन प्रवास करत असतात. ही ठिकाणे प्रवासप्रेमींमध्ये नेहमीच लोकप्रिय ठरतात पण तुम्ही कधी जगातील धेोकादायक ठिकाणांविषयी कधी ऐकले आहे का? या ठिकाणांना भेट देणे म्हणजे स्वत:च्या जीवाचा धोका वाढवून घेणे... मुख्य म्हणजे यात भारताच्याही एका ठिकाणाचा समावेश करण्यात आला आहे. असं म्हणतात की, या ठिकाणांना जो व्यक्ती भेट देतो तो पुन्हा परत येत नाही.
जगातील ५ सर्वात धोकादायक ठिकाणं जिथून परतणे जवळजवळ अशक्य... भारतातील या जागेचाही आहे समावेश
या यादित प्रथमस्थनी ब्राझीलच्या स्नेक आयलँडचा समावेश करण्यात आले आहे. याच्या नावावरुनच आपल्याला समजते की, हे बेट धोकादायक आणि विषारी सापांनी भरलेलं आहे. इथे अनधिकृत प्रवेश अमान्य आहे आणि ब्राझीलची नाैसेना याला नियंत्रित करते
टांझानियामधील अल्कलाईन सरोवर हे त्याच्या अत्यंत उच्च pH (१०.५ पर्यंत) आणि उष्ण तापमान (६०° सेल्सिअस पर्यंत) साठी ओळखला जातो. हे अतिउष्ण वातावरण अनेक जीवांसाठी प्राणघातक ठरते. इथली उष्णता इतकी जास्त आहे की, प्राण्यांचे मृतदेह अक्षरश: दगडात बदलतात. तथापि फ्लेमिंगोसारखे काही प्राणी येथे जगू शकतात
नाॅर्थ सेंटिनल आयलँड हा भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटाचा एक भाग आहे. इथे सेंटिनेलीज जमाती राहतात, ज्या बाहेरील जगापासून पूर्णपणे वेगळ्या आहेत. ही जमात बाहेरुन आलेल्या लोकांवर जीवघेणा हल्ला करते, ज्यामुळे इथे जाणं म्हणजे मृत्यूला आव्हाण देण्यासारखंच आहे
दानाकिल डिप्रेशन हे इथिओपियामध्ये स्थित, जगातील सर्वात उष्ण ठिकाणांपैकी एक आहे, जिथे तापमान ५०°C पेक्षा जास्त असू शकते. ज्वालामुखी, गरम पाण्याचे स्रोत आणि विषारी वायू यामुळे ते धोकादायक बनते
माउंट सिनाबुंग ही इंडोनेशियातील एक सक्रीय ज्वालामुखी आहे, जीचे वारंवार उद्रेक होत असतात. यामुळेच इथे ज्वालामुखीचा उद्रेक, राख आणि लावा यांचा धोका असतो. याच्या आसपास जाणेही धोकादायक ठरु शकतं