देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी वयाच्या ७४ व्या वर्षी सुद्धा अतिशय फिट आणि हेल्दी आहेत. मोदी त्यांच्या आहारात पौष्टिक आणि हेल्दी पदार्थांचे सेवन करतात. ज्यामुळे ते कायम निरोगी आहेत. निरोगी आरोग्यासाठी शरीराला पोषक घटनांची आवश्यकता असते. आहारात धान्य, भरपूर पाणी, फळे, भाज्या, पालेभाज्या, ड्रायफ्रूट इत्यादी पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला नरेंद्र मोदी वयाच्या ७४ व्या वर्षी फिट आणि हेल्दी राहण्यासाठी कोणत्या पदार्थांचे सेवन करतात, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – iStock)
वयाच्या ७४ व्या पंतप्रधान नरेंद्र मोदी 'हे' पदार्थ खाऊन आहेत फिट आणि हेल्दी
अनेक लोक रोजच्या आहारात शेवग्याच्या शेंगांचा आवर्जून समावेश करतात. यामध्ये असलेले कॅल्शियम हाडांना पोषण देते. तसेच यामध्ये विटामिन ए, के, सी इत्याद अनेक घटक आढळून येतात.
रोजच्या आहारात साजूक तुपाचे सेवन केल्यास शरीर कायम हायड्रेट राहील. यामध्ये सॅच्युरेटेड फॅट आणि लिक्विड गोल्ड आढळून येते, ज्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती सुधारते आणि पचनक्रिया सुधारू लागते.
आवळा हे फळ चवीला तुरट लागते. त्यामुळे अनेकांना आवळा खायला आवडत नाही. पण रोजच्या आहारात एक तरी आवळा खावा. यामुळे शरीरासह केस आणि त्वचेला अनेक फायदे होतात. आवळा रस नियमित उपाशी पोटी प्यावा.
मखाणाचे सेवन करणे आरोग्यच्या दृष्टीने अतिशय प्रभावी आणि हेल्दी आहे. यामध्ये असलेले फायबर, पोटॅशियम आणि इतर आवश्यक घटक शरीर निरोगी ठेवतात.
नरेंद्र मोदी रोजच्या आहारात डाळी, धान्य, नाचणी, बाजरी, ज्वारी इत्यादी धान्यांपासून तयार केलेल्या पदार्थांचे नियमित सेवन करता. कारण यामध्ये असलेले कॅल्शियम शरीराला आवश्यक घटक पुरवते.