देशभरामध्ये 76 व्या प्रजासत्ताक दिनाचा मोठा उत्साह दिसून येत आहे. राजधानी दिल्लीपासून देशातील प्रत्येक शहरामध्ये जल्लोषपूर्ण वातावरणात प्रजासत्ताक दिन साजरा केला जात आहे. राज्यातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह सर्व नेत्यांनी देखील शासकीय कार्यक्रमांमध्ये ध्वजारोहन केले आहे. प्रत्येक जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांनी त्यांच्या जिल्ह्यामध्ये जाऊन प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे.
76th Republic Day celebrated by all leaders including CM Devendra Fadnavis
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री निवासस्थान असलेल्या वर्षा बंगल्यावर राष्ट्रध्वजवंदन केले. यावेळी शासकीय इतमामध्ये ध्वजवंदन करण्यात आले.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी देखील मोठ्या उत्साहामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला. पुण्याचे पालकमंत्री असलेल्या अजित पवार यांनी शहरातील पोलीस संचलन मैदान येथे राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील त्यांच्याकडे पालकत्व असलेल्या ठाणे जिल्ह्यामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला. ठाणे शहरातील साकेत पोलीस मैदान येथे एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना राहिली.
गिरिश महाजन यांनी नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त नाशिकमधील पोलीस संचलन मैदान येथे त्यांनी राष्ट्रध्वज फडकावून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त अलिबाग येथील पोलीस परेड ग्राउंडवर ध्वजारोहण करून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. या मुख्य शासकीय ध्वजारोहण समारंभाच्या निमित्ताने पोलीस दलाने अत्यंत शिस्तबद्ध संचलन केले.
अजित पवार गटाचे नेते व मंत्री हसन मुश्रीफ यांनी देखील कोल्हापूरमध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला. यावेळी पोलीस कवायत मैदान येथे त्यांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली आहे.
सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व मंत्री चंद्रकांत पाटील यांनी देखील मोठ्या उत्साहामध्ये प्रजासत्ताक दिन साजरा केला आहे. यावेळी पोलिसांची परेड देखील पार पडली.