इंडियन प्रीमियर लीग 2025 चा हा 18 वा सीजन आता शेवटच्या टप्प्यात आहे. या सीझनमध्ये प्लेऑफमध्ये जाणारा पहिला संघ ठरला गुजरात टायटन्स. शुभमन गिलच्या नेतृत्वात गुजरात टायटनच्या संघाने कमालीची कामगिरी केली आहे. या सीझनमध्ये शुभमन गिल आणि साई सुदर्शन या दोघांनी संघाला प्लेऑफमध्ये नेण्यासाठी कसून मेहनत घेतली आहे. या सीझनमध्ये ही दोघांची मेहनत दिसूनही आली आहे. साई सुदर्शन आणि शुभमन गिल या दोघांनी आता सर्वाधिक धावा करणाऱ्या जोडीच्या यादींमध्ये त्यांचे नाव नोंदवले.
फोटो सौजन्य - X
एक आयपीएलच्या सीझनमध्ये विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स या दोघांनी सर्वाधिक पार्टनरशिप केली होती. आरसीबीचा स्टार फलंदाज विराट कोहलीने त्याचा पार्टनर एबी डिव्हिलियर्स सोबत 939 धावा केल्या होत्या. फोटो सौजन्य - X
सर्वाधिक पार्टनरशिपमध्ये धावा करण्याच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानावर विराट कोहली आणि फास्ट डूप्लेसी हे दोन फलंदाज आहेत. विराट कोहलीने डूप्लेसिसोबत 939 धावा केल्या होत्या. हा कारनामा या दोघांनी 2023 मध्ये गेला होता. फोटो सौजन्य - X
या यादीमध्ये तिसऱ्या स्थानावर चेन्नईचे दोन फलंदाज ऋतुराज गायकवाड आणि डेव्हॉन कॉन्व्हे या दोघांनी भागीदारी केली होती. 2023 मध्ये ऋतुराजने कॉन्वे सोबत 849 धावांची भागीदारी केली होती. फोटो सौजन्य - X
आता चौथ्या स्थानावर या यादीमध्ये नव्या जोडीने एन्ट्री केली आहे. 2025 मध्ये साई सुदर्शन आणि गिल दोघांनीही या सिझन मध्ये 839 धावा केल्या आहेत. गुजरातचे अजूनही दोन सामने शिल्लक आहेत. फोटो सौजन्य - X
या यादीमध्ये तिसरा स्थानावर डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेयरस्टो या दोघांच्या नावांचा समावेश आहे. या दोघांनी 2019 मध्ये 791 धावांची भागीदारी केली होती. जॉनी बेयरस्टो याला मुंबई इंडियन्सच्या संघामध्ये समावेश करण्यात आला आहे. फोटो सौजन्य - X