Aashadhi Ekadashi 2022 Police Officers Staff And Devotees Celebrated Ashadi Ekadashi By Wearing Pavali Arena And Fugdi Nrvb
VIDEO : पोलीस अधिकारी, कर्मचारी फुगडी घालत आषाढी एकादशी केली साजरी
औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यातील नावलौकिक असलेल्या प्रतिपंढरपूर येथे आषाढी एकादशीनिमित्त मोठे चैतन्याचे वातावरण पाहायला मिळत असून जनतेचे रक्षण आणि कर्तव्य निभावण्यासाठी कार्यतत्पर असणाऱ्या वाळुज एमआयडीसी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप गुरमे व पोलीस अधिकारी, कर्मचारी बांधव आणि भगिनींनी प्रति पंढरपुरात आषाढी एकादशीच्या चैतन्यमय वातावरणात विठुरायाच्या जयघोषात पाऊली रिंगण,फुगडी,घालत आज विठुरायाच्या भक्तिमय वातावरणात लीन होत प्रति पंढरपुरात आषाढी एकादशीचा आनंद द्विगुणित केला.