आम्हाला टॉयलेट पेपर सारखं वापरलं...! भारत-अमेरिकेच्या वाढत्या जवळकीतेवर पाकिस्तानचा जळफळाट (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
आसिफ ख्वाज यांनी पाकिस्तानच्या संसदेत बोलताना, २००१ नंतर अमेरिकेशी संबंधावर भाष्य केले आहे. त्यांनी अमेरिकेशी संबंध प्रस्थापित करणे पाकिस्तानची मोठी धोरणात्मक चूक असल्याचे म्हटले आहे. यामुळे पाकिस्तानचे राजकीय, आर्थिक आणि सामाजिक नुकसान झाले असल्याचे त्यांनी म्हटले. पाकिस्तानने आमचा टॉयलेटपेपर सारखा वापर केल्याचा आणि गरज संपल्यावर फेकून दिल्याचा आरोप केला आहे.
संसदेत बोलताना ख्वाजा यांनी पाकिस्तानच्या जुन्या निर्णयाचा उल्लेख केला. यामध्ये त्यांनी १९८० च्या दशकात सोव्हिएत युनियनविरोधी आणि २०११ च्या अफगाणविरोधी युद्धात अमेरिकेला साथ दिल्याची सर्वात मोठी चूक असल्याचे म्हटले. त्यांच्या मते पाकिस्तान इस्लामच्या रक्षणासाठी किंवा जिहादासाठी युद्ध लढला नाही, तर अमेरिकेच्या पाठिंबा आणि राजकीय वैधता मिळवण्यासाठी युद्ध लढले.
पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांनी खुलासा केला की, जिहादच्या नावाखाली त्यांच्या लोकांची दिशाभूल करण्यात आली. प्रत्याक्षात त्यांना प्रॉक्सी वॉर मध्ये अडकवण्यात आले. ख्वाजा यांनी हे कबूल केले की या युद्धांचे समर्थन करण्यासाठी त्यांनी पाकिस्तानच्या शैक्षणिक पाठ्यक्रमातही बदल केला. याचा विपरित परिणाम पाकिस्तानमध्ये झाला.
ख्वाजा यांनी अमेरिकेने पाकिस्तानचा त्यांच्या स्वार्थासाठी वापर करुन घेत असल्याचे म्हटले. त्यांनी म्हटले की, अमेरिकेने त्यांना टॉयलेट पेपरपेक्षाही वाईट वागणूक दिली पूर्वीच्या पाकिस्तानी धोरणांना वाढत्या हिंसाचार, अतिरेकीपण आणि आर्थिक संकटासाठी ख्वाजा यांनी जबाबादार धरले.
Big statement –
“Pak was used like toilet paper” Khawaja Asif admitted that Pakistan has historically fought wars for superpowers & waged a “Made in USA” jihad. Asif also claimed that Pakistan was treated “worse than toilet paper” by USA, used for a purpose and then discarded. pic.twitter.com/DpNFAWfG9I — War & Gore (@Goreunit) February 11, 2026
Ans: आसिफ ख्वाजा यांनी, पाकिस्तानने २००१ पासून अमेरिकेशी संबंध प्रस्थापित करणे सर्वात मोठी चूक होती. अमेरिकेने केवळ त्यांच्या स्वार्थासाठी पाकिस्तानचा वापर करुन घेतला, त्यांना टॉयलेट पेपरपेक्षाही तुच्छ वागणूक दिली असे म्हटले.
Ans: २०११ च्या अफगाणविरोधी युद्धात अमेरिकेला साथ दिल्याची सर्वात मोठी चूक असल्याचे आसिफ ख्वाजा यांनी म्हटले.






