पारंपरिक सण-समारंभ किंवा लग्नसराई किंवा इतर सणावरांच्या दिवसांमध्ये सोन्याच्या दागिन्यांसोबतच इतर पारंपारिक दागिने परिधान केले जातात. त्यातील सगळ्यांच्या अतिशय आवडीचा दागिना म्हणजे स्टायलिश दिसाणारे एअरकफ. फॅशनच्या युगात बाजारात अनेक नवनवीन दागिने पाहायला मिळतात. एअरकफ आपल्या पूर्ण लूकला रॉयल आणि ग्लॅमरस टच देतात, ज्यामुळे कानात इतर कोणतेही दागिने घालण्याची आवश्यकता भासत नाही. एअरकफ घातल्यानंतर कान अतिशय भरगच्च दिसतात. त्यामुळे कोणत्याही नऊवारी किंवा सहावारी साडीवर तुम्ही मोराच्या डिझाइनचे एअरकफ घालू शकता. चला तर पाहुयात डिझाइन. (फोटो सौजन्य – pinterest)
साडीपासून वेस्टर्न आउटफिटपर्यंत सगळ्यावर खुलून दिसतील मोर डिझाइनचे स्टायलिश एअरकफ, नक्की ट्राय करा

लग्न सोहळ्यात नऊवारी साडी नेसल्यानंतर त्यावर तुम्ही मोराच्या डिझाइनचे सुंदर एअरकफ घालू शकता.याशिवाय बजेट फ्रेंडली दरात बाजारामध्ये एअरकफ उपलब्ध आहेत.

पैठणी, कांजिवरम किंवा साध्या सिल्क साडीवर हेवी डिझाइनचे एअरकफ स्टायलिश दिसतील. एअरकफ घातल्यानंतर इतर कोणतेही दागिने घालण्याची आवश्यकता नाही.

नऊवारी साडी नेसल्यानंतर सोन्याचे दागिने घालण्याऐवजी मोत्याचे एअरकफ परिधान करावेत. नाजूक चांदवे आणि मोत्यांचे लटकन असलेले एअरकफ वजनाने अतिशय हलके असतात.

हेवी डायमंड आणि ज्युबली वर्क असलेलेे एअरकफ सिल्क साडी, डिझायनर नेट साडी किंवा जॉर्जेटच्या हेवी वर्क साड्यांवर सुंदर दिसतील. मोराचा आकार आणि लाल रंगाच्या खड्याचा वापर करुन डिझाइन केलेले एअरकफ घातल्यास सगळेच कौतुक करतील.

अनेकांना नाजूक दागिने घालायला खूप जास्त आवडतात. अशावेळी तुम्ही वजानाने हलके आणि नाजूक एअरकफ तुम्ही परिधान करु शकता. अस्सल पारंपरिक दागिना नऊवारी साडी, खण साडी किंवा काठापदराची सिल्क साडी इत्यादीवर या डिझाइनचे एअरकफ घालू शकता.






