सकाळी उठल्यानंतर अनेकांच्या दिवसाची सुरुवात चहा किंवा कॉफीने होते. मात्र चहा कॉफी हे पेय आरोग्यासाठी अतिशय घातक आहेत. रिकाम्या पोटी चहा किंवा कॉफीचे सेवन केल्यास पचनक्रिया बिघडण्याची शक्यता असते. त्यामुळे सकाळी उठल्यानंतर कधीही चहा कॉफीचे रिकाम्या पोटी सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला दिवसाची सुरुवात आनंदात आणि सकारात्मक ऊर्जा देण्यासाठी नाश्ता करताना कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबदलन सविस्तर मागिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया.(फोटो सौजन्य – iStock)
सकाळी उठल्यानंतर नियमित करा या पाण्याचे सेवन
बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यासाठी ऍपल सायडर व्हिनेगरचे सेवन पाण्यात मिक्स करून करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात.हे पाणी नियमित प्यायल्यास ऍसिडिटीची समस्या कमी होईल.
पुदिन्याच्या पानांचे पाणी त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. या पाण्यातील घटकांमुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. याशिवाय त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते.
सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी लिंबू पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. लिंबू पाण्याच्या सेवनामुळे पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात आणि पोट स्वच्छ होते.
हळदीच्या पाण्याचे सेवन केल्यामुळे शरीरात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातात. हळदीमध्ये आढळून येणारे क्युमिन शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहे.
पुदिन्याच्या पानांचे पाणी त्वचेसाठी अतिशय फायदेशीर आहे. या पाण्यातील घटकांमुळे शरीरात थंडावा निर्माण होतो. याशिवाय त्वचा अधिक सुंदर आणि चमकदार दिसते.