भारताचा संघ सध्या ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना खेळत आहे. 06 डिसेंबर हा क्रिकेट जगतातील खूप खास दिवस आहे. एक-दोन नव्हे तर अनेक क्रिकेटपटू या दिनी आपला वाढदिवस साजरा करत आहेत. या यादीत टीम इंडियाचा दिग्गज वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचाही समावेश आहे. तर आम्ही तुम्हाला आज 6 डिसेंबर रोजी वाढदिवस साजरा करणाऱ्या क्रिकेट खेळाडू कोणते आहेत यावर एकदा नजर टाका.
भारताचे हे खेळाडू ६ डिसेंबरला साजरा करतात त्यांचा वाढदिवस. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचे महान माजी खेळाडू आणि आताचे कॉमेंटेटर आरपी सिंह त्याचा ३८ वा वाढदिवस साजरा करत आहेत. २००६ ते २०११ यादरम्यान ते भारतासाठी क्रिकेट खेळले आहेत. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा अनुभवी फलंदाज रवींद्र जडेजा आज बॉर्डर गावस्कर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलियाला आहे. परंतु त्याला प्लेइंग ११ मध्ये अजुनपर्यत स्थान मिळाले नाही. जडेजा आज ३५ वा वाढदिवस साजरा करत आहे. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
टीम इंडियाचा कसोटीमधील ३२ वर्षीय दिग्गज खेळाडू करुण नायर आज त्याचा खास दिवस साजरा करत आहे. त्याने टीम इंडियासाठी कसोटीमध्ये कमालीची कामगिरी केली आहे परंतु त्याला संघामध्ये फार वेळ संधी मिळाली नाही. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा वेगवान गोलंदाज सध्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा दुसरा सामना खेळत आहे. आज बुमराह त्याचा ३० वा वाढदिवस साजरा करत आहे. पहिल्या कसोटीमध्ये टीम इंडियाने बुमराहच्या नेतृत्वाखाली सामना नावावर केला होता. फोटो सौजन्य - सोशल मीडिया
भारताचा फलंदाज श्रेयस अय्यर त्याचा आज २९ वा वाढदिवस साजरा करत आहे. सध्या तो देशातंर्गत क्रिकेटमध्ये संघाची कमान सांभाळणार आहे. आयपीएलमध्ये सुद्धा त्याच्यावर करोडोंचा पाऊस पाडला. फोटो सौजन्य - सोशल मीडिया