संपूर्ण देशभरात प्रजसत्ताक दिन साजरा केला जातो. शाळा, कॉलेज, सरकारी महाविद्यालय इत्यादी अनेक ठिकणी झेंडावंदन करून शाळेत वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. यादिवशी प्रामुख्याने पांढऱ्या रंगाची साडी नेसली जाते. पांढऱ्या रंगाच्या साडीवरील लुक आणखीनच उठावदार आणि स्टायलिश दिसण्यासाठी त्यावर पांढऱ्या रंगाचा ब्लाऊज परिधान न करता वेगवेगळ्या रंगाचे स्टायलिश ब्लाऊज घालावेत. यामुळे नेहमीपेक्षा तुमचा लुक खूप वेगळा दिसेल. याशिवाय पांढऱ्या रंगाच्या साडीवर कॉन्ट्रास्ट ब्लाऊज खुलून दिसते. चला तर पाहुयात पांढऱ्या रंगाच्या साडीवर तुम्ही कोणते ब्लाऊज परिधान करू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)
पांढऱ्या शुभ्र साडीवर शोभून दिसतील 'या' रंगाचे आकर्षक ब्लाऊज, नेहमीपेक्षा दिसेल हटके लुक

प्रत्येक महिलेच्या कपाटात वेगवेगळ्या रंगाचे ब्लाऊज असतात. त्यातील लाल रंग अतिशय कॉमन आहे. डिझायनर लाल रंगाचा ब्लाऊज असेल तर तो तुम्ही कॉटनच्या पांढऱ्या साडीवर मॅच करू शकता.

पांढऱ्या रंगाच्या साडीवर सर्वच महिलांना प्रामुख्याने गुलाबी रंगाचे ब्लाऊज घालतात. पण कायमच डार्क गुलाबी रंगाचे ब्लाऊज घालण्याऐवजी फिकट गुलाबी रंगाच्या ब्लाऊजची निवड करावी.

कायमच कॉटनची साडी नेसण्याऐवजी सॅटिन किंवा शिफॉन फॅब्रिकमधील पांढऱ्या रंगाची साडी नेसावी. या लुकमध्ये तुम्ही उठावदार आणि सुंदर दिसाल.

अनेकांना कलरफुल किंवा कॉटनचा प्रिंटेट ब्लाऊज घालायला खूप जास्त आवडते. कॉटनच्या ब्लाऊजमध्ये खूप जास्त आरामदायी वाटते. कॉटनचे रंगीत ब्लाऊज कोणत्याही साडीवर शोभून दिसतात.

कांजीवरम पांढऱ्या रंगाची साडी खरेदी करताना त्याच्या काठाला असलेल्या रंगांनुसार ब्लाऊजची निवड करावी. यामुळे लुक थोडासा पारंपरिक आणि मॉर्डन दिसतो.






