Rihanna मुंबई आली आहे. मुंबईत आल्याबरोबर तिने Bollywood कलाकारांसह पार्टी केली. तसेच सध्या तिने अंबानी यांच्या राहत्या निवासस्थानी जाऊन तेथील पाहुणचाराचा आनंद घेतला आहे. परदेशी पाहुण्याचे देशी स्वागत अंबानी कुटुंबीयांनी केले आहे. या स्वागतादरम्यान तिला भारतीय परंपरेचा नमुना दाखवण्यात आला आहे. या अगोदर Rihanna जामनगर येथे अनंत-राधिकाच्या ग्रँड विवाहसोहळ्यासाठी आली होती.
मुंबईत अनंत आणि राधिका अंबांनीने केले Rihanna चे स्वागत! (फोटो सौजन्य - Social Media)

अंबानी यांच्या मुंबईतील निवासस्थानी Rihanna स्न्हेहभोजनाच्या कार्यक्रमात उपस्थित राहिली आहे. Rihanna च्या स्वागतासाठी फुलांची उधळण करण्यात आली आहे.

अंबानींच्या सुनांनी Rihanna चे स्वागत केले आहे. भारतीय पारंपरिक नृत्याचा नमुना Rihanna च्या स्वागतासाठी सादर करण्यात आला.

Rihanna ने अंबानींच्या घरातील देवघरात जाऊन पुजाआराधना केली आहे. Rihanna भक्तीमध्ये लीन दिसून आली आहे.

Rihanna तिचा Brand 'फेंटी ब्युटी' चे लाँन्च रिलायन्स रिटेल्सच्या 'तिरा' येथे झाले, त्यामुळे अंबांनीसोबत तिची ही भेट झाली.

Rihanna ने काळ्या रंगाचा तसेच ‘मुगलर’ कलेक्शनमधील निऑन रंगाचा ड्रेस या कार्यक्रमांमध्ये परिधान केला होता.






