पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी सतत अनेक प्रयत्न केले जातात. व्यायाम, वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन, आहारात बदल इत्यादी अनेक गोष्टी फॉलो केल्या जातात. मात्र चुकीचा आहार घेतल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. यामुळे पोटावर वाढलेला चरबीचा घेर आणखीनच वाढू लागतो. पोटावर वाढलेल्या चरबीच्या घेरमुळे अनेकदा महिलांना अस्वस्थ वाटू लागते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी कोणत्या पेयांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
बेली फॅटमुळे त्रस्त आहात? सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' पेयांचे सेवन
शरीर हायड्रेट ठेवण्यासाठी कोरफडीच्या रसाचे सेवन करावे. या रसाच्या सेवनामुळे शरीराला अनेक फायदे होतात. लठ्ठपणा, आयबीएस, हाय ब्लड शुगर इत्यादी समस्यांपासून आराम मिळतो.
रोज सकाळी उठल्यानंतर दुधाच्या चहाचे सेवन करण्याऐवजी दालचिनीच्या चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे शरीरात अनेक सकारात्मक बदल दिसून येतात.
ब्लॅक कॉफीमध्ये कमी कॅलरी, कॅफिन आणि अँटीऑक्सिडंट्स इत्यादी अनेक घटक आढळून येतात. यामुळे फ्री रॉडिकल्समुळे शरीराचे होणारे नुकसान टाळता येईल.
ग्रीन टी मध्ये अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणात आढळून येतात. यामध्ये कॅटेचिन आढळून येते. ग्रीन टी प्यायल्यामुळे मेटाबॉलिज्म वाढवण्यासोबत वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.
पोटावर वाढलेला चरबीचा घेर कमी करण्यासाठी कोमट पाण्यात लिंबाचा रस टाकून मिक्स करा. उपाशी पोटी महिनाभर या पाण्याचे सेवन केल्यास पोटावर वाढलेली चरबी कमी होईल.