आषाढी वारीला सुरुवात झाली असून काही दिवस आधीच आळंदी आणि देहूतून निघालेल्या माऊलींच्या पालखीने सासवडमध्ये प्रस्थान केलं आहे. वारीचे एकूण मुक्काम हे 15 ठिकाणं आहेत. या 15 ठिकाणांमना धार्मिकदृष्ट्या देखील तितकच महत्त्व आहे.वारीची सुरुवात ही आळंदीपासून होते. त्यामुळे आत्म्याच्या आनंदाने वारीची सुरुवात होते असं म्हणतात.
आळंदी: वारीची सुरुवात ही आळंदीपासून होते. त्यामुळे आत्म्याच्या आनंदाने वारीची सुरुवात होते असं म्हणतात.
पुणे वारीला निघाल्याने पापांचा नाश होऊन पुण्य मिळते म्हणून पुणे.
दिवेघाट: अष्टांगयोगाच्या म्हणजेच यम ते समाधी आचरणातून जाण्याचा मार्ग म्हणजे दिवेघाट.
सासवड: सप्तचक्रांची (मूलाधार ते शून्यचक्र) प्राणायामने होणारी जागृर्ती आणि सोपानदेवांचे दर्शन म्हणजे सासवड.
जेजुरी : 'ज' म्हणजे 'जितेंद्र', 'जुरी' म्हणजे 'जास्त त्रास न घेणे', जो जास्त त्रास न घेता इंद्रियांना जिंकतों तो आनंदी होतो. म्हणून वारीचा पुढचा मुक्काम हा जेजुरी आहे.
वाल्हे: भर तारुण्यात प्रेमळ आणि जिव्हाळासंपन्न होणे, (वाल्मिकी ऋषींच्या समाधीचे दर्शन) म्हणजे वाल्हे गाव.
लोणंद: श्रीविठ्ठल भक्तीने परमानंद मिळवून तो इतरांना देणे, आनंद वाटण्यात खरं सुख आहे म्हणून मुक्कामाचे हे ठिकाण म्हणजे लोणंद.
तरडगाव: ब्रह्मानंदाचा अनुभव न घेतल्यास जीवनात रहावे लागेल, या सिद्धांताचे चिंतन.
फलटण: ब्रह्म सत्य, जग मिध्या हा अनुभव वारकऱ्याला येतो, जीवनाचे सत्य समजते ते ठिकाण फलटण.
बरड : संसारातील द्वंद्वापासून मुक्ती आणि बासनाहीन जीवन (बरडच्या जमिनीसारखे) ते ठिकाण बरड.
नातेपुते : इतर नात्यांच्या मोहातून मुक्त होऊन केवळ श्रीविठ्ठलाचे होणे ते गाव म्हणजे नातेपुते.
माळशिरस: नामस्मरण, ध्यान आणि कीर्तन-प्रवचनाने ज्ञानाची साखळी पूर्ण होऊन विठ्ठलरूप होणं ते माळशिरस.
वेळापूर: एक क्षणही वाया विठ्ठलभजन करण्याचे ज्ञान प्राप्त होणे म्हणजे वेळापूर गाव.
वाखरी: वाणी प्रासादिक आणि वाचासिद्ध होणे,म्हणजे वाखरी.
पंढरपूर: शेवटी पंढरपूरला जाऊन पूर्णपणे विठ्ठलाचरणी समर्पित होणं ते ठिकाण म्हणजे पंढरपूर.