भारतीय संस्कृतीत मराठमोळ्या दागिन्यांना खूप जास्त महत्व आहे. दागिने घातल्यानंतर लुक अतिशय सुंदर आणि पारंपरिक दिसतो. त्यातील साऱ्यांचा आवडणारा दागिना म्हणजे बांगड्या. लहान मुलींपासून ते अगदी वयस्कर बायकांपर्यंत सर्वच हातामध्ये बांगड्या घालतात. लग्न झाल्यानंतर हिरव्या बांगड्या घालण्याची प्रथा आहे. बांगड्या घालणे म्हणजे भारतीय संस्कृतीत सौंदर्य, सौभाग्य आणि समृद्धीचे प्रतीक मानले जाते. यामुळे वैवाहिक स्थिती दर्शवते, सकारात्मक ऊर्जा आकर्षित करते, आणि रक्ताभिसरण सुधारण्यास मदत होते. चला तर पाहुयात बांगड्यांचे विविध प्रकार. (फोटो सौजन्य – pinterest)
बांगड्यांचे 'हे' विविध प्रकार कोणत्याही साडी, ड्रेसवर दिसतील शोभून! मराठमोळ्यांनी दागिन्यांनी पडेल सौंदर्यात भर

बांगड्या घातल्यानंतर लुक स्टायलिश आणि मॉर्डन दिसतो. हल्ली सर्वच महिलांच्या हातात हिरव्या बांगड्या असतात. हिरव्या बांगड्यांचे मधे घुंगरू बांगड्या परिधान केल्यास हात भरलेला वाटेल.

बाजारात वेगवेगळ्या डिझाईनचे कडे उपलब्ध आहेत. त्यातील प्रमुख आकर्षक म्हणजे मोराचे पीस असलेले सुंदर राजेशाही कडे. लग्नातील संगीत किंवा हळदी लुकसाठी तुम्ही या कड्यांची निवड करू शकता.

हेव्ही नक्षीकाम, कुंदन, पोल्की, मोत्यांची जडणघडण आणि अँटिक फिनिश असलेले कुंदन कडे लेहेंगा किंवा हेवी डिझाईन असलेल्या साडीवर सुंदर दिसतात.

अनेकांना सोन्याच्या हेवी डिझाईन असलेल्या बांगड्या घालायला खूप जास्त आवडतात. त्यामुळे हिरव्या बांगड्यांच्या मधे तुम्ही सोन्याचे कडे घालू शकता.

पारंपरिक मोत्याचे दागीने नऊवारी किंवा सहावारी साडीवर शोभून दिसतात. साडी नेसल्यानंतर मुलीसुद्धा हातामध्ये मोत्याचे सुंदर कडे किंवा बांगड्यांचा सेट घालतात.






