संपूर्ण भारतामध्ये मोठ्या जलौषात हनुमान जयंती साजरा केली जाते. अनेक लोक हनुमानाचे भक्त आहेत. हिंदू पंचांगानुसार हनुमान जयंती 12 एप्रिल ला साजरी केली जाणार आहे. या दिवशी राज्यातील वेगवेगळ्या भागात असलेल्या हनुमान मंदिरांमध्ये मोठी गर्दी जमते. तसेच हनुमानाच्या भक्तांसाठी प्रत्येक दिवस खास असतो. नियमित हनुमानाची पूजा केल्यामुळे जीवनातील सर्व अडचणी आणि दुःख दूर होतात. देशभरात अनेक ठिकाणी हनुमानाची मंदिर आहेत. आज आम्ही तुम्हाला हनुमान जयंतीच्या दिवशी भारतातील कोणत्या मंदिरांना भेट द्यावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. चला तर जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – सोशल मीडिया)
भारतातील 'या' मंदिरांमध्ये मोठ्या जलौषात साजरा केली जाते हनुमान जयंती
राजस्थानमधील दौसा जिल्ह्यात असलेले मेहेंदीपूर बालाजी मंदिर अतिशय प्रसिद्ध मंदिर आहे. जे लोक काळ्या जादू आणि दुष्ट आत्म्याने प्रभावित होतात,मी अशी लोक या मंदिरात गेल्यानंतर बरे होतात, अशी मान्यता आहे.
वाराणसीमध्ये असलेले संकट मोचन हनुमान मंदिर अतिशय प्रसिद्ध मंदिरांपैकी एक आहे. मंदिराची स्थापना गोस्वामी तुलसीदास यांनी केली आहे. या मंदिराचे दर्शन घेतल्यामुळे जीवनातील अनेक संकटं दूर होतात.
मारघाटात असलेले हनुमान मंदिर जमना बाजार हनुमान मंदिर म्हणून सगळीकडे ओळखले जाते. पौराणिक कथांनुसार, भगवान हनुमान यांनी लक्ष्मणासाठी संजीवनी आणण्यासाठी गेलेल्या काळात या मंदिरात विश्रांती घेतली होती.
दिल्लीमधील प्राचीन मंदिरांपैकी असलेले मंदिर म्हणजे प्राचीन हनुमान मंदिर. कौरवांशी युद्ध जिंकल्यानंतर पांडवांनी दिल्लीमध्ये हनुमान मंदिर बांधले होते.
अयोध्यातील हनुमान गुढी हे मंदिर १० व्या शतकातील मंदिर आहे. इथे असे मानले जाते की, येथे असलेल्या गुहेमध्ये हनुमानजी राहत होते. त्यांनी रामजन्मभूमी किंवा रामकोटचे रक्षण केले.