जगभरात अस्सल हिऱ्यांच्या दागिन्यांना खूप जास्त महत्व आहे. कारण किंमतीने महाग असलेले डायमंड फार कमी लोकांकडे पाहायला मिळतात. सण समारंभ किंवा कोणत्याही कार्यक्रमात महिला सुंदर सुंदर दागिने परिधान करून मिरवतात. सोनं आणि चांदीच्या दागिन्यांप्रमाणेच मागील अनेक शतकांपासून हिऱ्यांचे दागिने प्रसिद्ध आहेत. हिऱ्यांच्या दागिन्यांना फार वर्षांपूर्वीचा इतिहास लाभला आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला हिऱ्यांच्या दागिन्यांचा इतिहास? हिऱ्यांचे दागिने कसे बनवले जातात? याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
भारतामुळे जगाला कळले हिऱ्यांचे महत्त्व! Diamond Jwellery चा रंजक इतिहास तुम्हाला माहित्ये का?

हिरा हा कार्बन धातूचा सगळ्यात कठीण आणि चमकदार प्रकार आहे. असली हिरे पृथ्वीच्या आत लाखो वर्षांपासून उच्च तापमान आणि दाबाखाली हळूहळू तयार होतात. जगातील सगळ्यात मौल्यवान रत्नांमध्ये हिऱ्यांच्या दागिन्यांचे नाव कायमच घेतले जाते. भारताच्या इतिहासात हिऱ्यांचा वापर केवळ सौंदर्यासाठीच नाहीतर शुभ आणि शक्तीचे प्रतीक म्हणून सुद्धा केला जातो.

जगभरात पहिले हिरे भारतामध्ये २०००-३००० वर्षांपूर्वी सापडले होते. ऋग्वेद आणि अर्थशास्त्रात हिऱ्यांचा उल्लेख करण्यात आला आहे. हिऱ्यांचा वापर दागिने बनवण्यासाठी नाहीतर प्रकाशाचे अपवर्तन करण्यासाठी केला जात होता. पण कालांतराने हिऱ्यांचे मूल्य वाढले आणि दागिने बनवण्यासाठी हिऱ्यांचा वापर करण्यात आला.

१९ व्या शतकापर्यंत मुघलांनी भारतावर राज्य केले होते. त्यांच्या राजवटीमध्ये अनेक दुर्मिळ वस्तू मुघल दरबाराचा भाग बनल्या होत्या, ज्यामध्ये हिरे आणि इतर दागिन्यांचा समावेश होता. जगप्रसिद्ध कोहिनूर हिरा पहिल्या मुघल दरबाराचा भाग होता. मान्यतेनुसार, एक हजार वर्षांआधी हिरे केवळ भारतात अस्तित्वात होते.

भारतातील पहिला हिरा अलेक्झांडर द ग्रेटने इसवी सन पूर्व ३२७ मध्ये युरोपमध्ये घेऊन गेले. पण दागिने तयार करण्यासाठी हिऱ्यांचा वापर मागील अनेक वर्षांपासून केला जात आहे. हंगेरियन राणीच्या मुकुटात १०७४ मध्ये पहिल्यांदाच हिरे बसवण्यात आले होते. त्यानंतर १५ व्या शतकात पॉइंट-कट हिऱ्याचा शोध लागला.

भारतीय दागिन्यांमध्ये हिऱ्यांसोबतच पन्ना, माणिक आणि नीलमणी इत्यादींचा समावेश आहे. या रत्नांचा वापर करून सुंदर सुंदर दागिने तयार केले जातात. हिरे सोने, प्लॅटिनम किंवा गुलाबी सोन्यात जडवलेले जातात.






