Iran Israel युद्धाची ठिणगी थेट अमेरिकेत! खामेनेई समर्थित निदर्शनातील गोळीबारात भारतीय विद्यार्थिनीसह चार ठार (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
मिळालेल्या माहितीनुसार, एका हल्लेखोराने केलेल्या अंदाधुंद गोळीबारात भारतीय वशांच्या विद्यार्थीनी सविता शान (वय २१) चा मृत्यू झाला आहे. तसेच आणखी तीन जणांचा मृत्यू झाल्याचेही वृत्त मिळाले आहे. या घटनेमुळे अमेरिकेतील भारतीय समुदायात भीतीचे वातावरण पसरले आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, टेक्सासट्या ऑस्टिनमधील एका बीयर गार्डनबाहेर गोळीबार झाला. एका ५३ वर्षी हल्लेखोराने अचानक रस्त्यावरील नागरिकांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली. या भीषण गोळीबार भारतीय विद्यार्थीनी सविता शान आणि आणखी तीन जणांना आपला जीव गमवावा लागला. मिळालेल्या माहितीनुसार या हल्ल्यात १४ जण जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तसेच घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने प्रत्युत्तरदाखल हल्लेखोराला जागीच ठार केले. नडियागाड डियाग्ने अशी याची ओळख पटवण्यात आली आहे.
२१ वर्षीय सविता शान ही युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विषयाचे शिक्षण घेत होती. यावर्षी तिची पदवी पूर्ण होणार होती. परंतु तिचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वी तिचा दुर्दैवी अंत झाला. सविता ऑस्टिन तमिळ संगम यांसारख्या सामाजिक संस्थांमध्ये देखील सहभाग घेत असे. विद्यापीठाचे अध्यक्ष डिम डेविस यांनी तिचे वर्षन एक प्रतिभाशाली विद्यार्थीनी, निष्ठावान मैत्रीण आणि प्रेमळ मुलगी म्हणून केले आहे. तसेच या घटनेवर दु:ख व्यक्त केले आहे.
हल्लेखोराची ओळख नडियागाड अशी पटवण्यात आली असून को मूळचा स्थलांतरित असल्याचे समोर आले आहे. हल्ल्याच्या वेळी त्याच्या हातात इराणचा ध्वज आणि अल्लाहची संपत्ती असे वाक्य लिहेलेला टी-शर्ट घातलेला होता. नुकतेच अमेरिका आणि इस्रायलने इराणवर केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा हल्ला झाला असल्याचा संशय व्यक्त केला जाक आहे. सध्या एफबीआय या घटनेची सखोल चौकशी करत आहे. या घटनेने संपूर्ण अमेरिकेत दहशताची वातावरण पसरले आहे. तसेच सरकारने ना देशभरातील दहशतवादविरोधी संस्थांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत. तर नागरिकांना शांतता राखण्याचे आणि कोणत्याही संशायस्पद हालचालींची माहिती त्वरित पोलिसांमी देण्याचे आवाहन केले आहे.
Ans: अमेरिकेच्या टेक्सास राज्यातील ऑस्टिन येथे गोळीबाराची घटना घडली आहे.
Ans: अमेरिकेच्या टेक्सास राज्यात एका अज्ञात व्यक्तीने अचानक रस्त्यावरील नागरिकांवर गोळ्या झाडण्यास सुरुवात केली, ज्यामध्ये एका भारतीय विद्यार्थीनीसह चार जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात १४ जखमी झाले आहेत.
Ans: २१ वर्षीय सविता शान ही युनिव्हर्सिटी ऑफ टेक्सासमध्ये अर्थशास्त्र आणि व्यवस्थापन विषयाचे शिक्षण घेत होती. यावर्षी तिची पदवी पूर्ण होणार होती. परंतु तिचे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वी तिचा दुर्दैवी अंत झाला.
Ans: मिळालेल्या माहितीनुसार, हल्लेखोराचे नाव नडियागा डियाग्ने असून (वय ५३) तो मूळचा सेनेगलचा रहिवासी आहे. त्याने हल्ल्यावेळी इराणचा ध्वज घेतला होता. तसेच अल्लाहची संपत्ती असलेला टीशर्ट घातला होता. यामुळे इराणवरील अमेरिका-इस्रायलच्या कारवाईमुळे हा गोळीबार झाला असल्याचे म्हटले जात आहे.






