Benefits Of Kesar: केशर हा जगातील सर्वात महाग मसाल्यांपैकी एक आहे. आपण त्याच्या गुणांबद्दल जितके बोलू तितके कमी आहे. केशर हा केशर क्रोकसच्या फुलांपासून मिळणाऱ्या धाग्यासारखा दिसणारा मसाला आहे. याचा वापर खाण्यापासून ते दुधासह पिण्यापर्यंत आणि विविध प्रकारच्या मिठाई तयार करून स्वाद वाढविण्यासाठी केला जातो. खीरची चव वाढवण्यासाठीही अनेकजण केशर वापरतात. केशर नियमित खाल्ल्याने अनेक फायदे मिळतात. मानसिक समस्या दूर होतात तसेच त्वचेचे सौंदर्यही वाढते. याशिवाय केशर कामवासना वाढवण्यासाठी आणि मूड सुधारण्यासाठी देखील फायदेशीर आहे. चला जाणून घेऊया रोज केशर खाल्ल्याने कोणते आरोग्य फायदे होतात, आयुर्वेदिक डॉक्टर माधव भागवत यांनी काही महत्त्वाच्या टिप्स दिल्या आहेत (फोटो सौजन्य - iStock)
केशर हे केवळ सुगंधासाठी वा स्वादासाठीच योग्य नाही तर तुम्हाला केशराच्या खाण्यामुळे शरीरालाही अनेक फायदे मिळतात. केशर हा खरंच सर्वात महागडा मसाला आहे. केशराची शेती करणेही सोपे नाही. मात्र केशराचे फायदे आपण नक्कीच जाणून घेऊ शकतो
केशरमध्ये अँटिऑक्सिडंट असतात जे डोळ्यातील पडदा संरक्षित करण्यास आणि डोळ्यांचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात. हे मॅक्युलर डिजेनेरेशन आणि मोतीबिंदू यांसारख्या डोळ्यांच्या समस्या टाळू शकतात
केशरच्या मदतीने तुमची स्मरणशक्ती सुधारू शकते. ज्या व्यक्तींना काहीच लक्षात राहात नाही अशा व्यक्तींनी केशराचे सेवन करायला हवे. विशेषतः वाढत्या वयाबरोबर अनेकांना अल्झायमर रोग होतो, हे टाळण्यासाठी केशराची मदत घ्यावी. नियमित तुम्ही भात, दूध यासह केशराच्या एखाद्या धाग्याचे सेवन करावे
केशरमध्ये व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स यांसारखी अनेक संयुगे असतात जी प्रतिकारशक्ती वाढवू शकतात. हे सर्दी, खोकला, फ्लू आणि ताप यासारख्या सामान्य विषाणूजन्य रोगांपासून संरक्षण करण्यास मदत करतात
जगभरातील अनेक संशोधनांमध्ये हे सिद्ध झाले आहे की केशर मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते, ते रक्तातील साखरेची पातळी कमी करते आणि इन्सुलिनची संवेदनशीलता वाढवते. त्यामुळे ज्या व्यक्तींना डायबिटीसने घेरले आहे त्यांनी आपल्या आहारात आठवड्यातून १-२ दिवस केशर समाविष्ट करून घ्यावे
केशरमध्ये संयुगे असतात जे सेरोटोनिन सारख्या न्यूरोट्रांसमीटरचे नियमन करण्यास मदत करतात, जे तुमचा मूड सुधारू शकतात आणि नैराश्य देखील दूर करू शकतात. तसंच तुम्ही आपल्या डॉक्टरांना विचारल्याशिवाय याचे सेवन करू नये आणि अगदी योग्य प्रमाणात केशराचे सेवन करावे