Middle East Crisis : खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाचा इस्रायलला कसा लागला सुगावा? इराणच्या 'त्या' नेत्याने केला विश्वासघात? (फोटो सौजन्य: एआय जनरेटेड)
शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) इस्रायलने इराणची राजधानी तेहरानसह अनेक ठिकाणांवर हल्ला केला. या हल्ल्यात सुरुवातीला तेहरानमध्ये सर्वोच्च नेत्यांच्या मुख्यालयाला आणि अणु केंद्रांना लक्ष करण्यात आले. इस्रायलने इराणच्या तेहरानसह, कोम, इस्फाहान, शिराज, तब्रिझ आणि केरमानशाह यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये इस्रायलने एकामागून एक स्फोट केले. यामुळे मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला होता.
इस्रायली हल्ल्याला इराणने देखील प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. इराणने इस्रायलच्या दिशेने ७० हून अधिक बॅलेस्टिक मिसाइल्सचा मारा केला आहे. तसेच अनेक अमेरिकेच्या लष्करी तळांवरही हल्ला केला. यामुळे अमेरिका-इस्रायलने पुन्हा प्रतिहल्ला करत इराणवर एकामागून एक हल्ले केले.
या भीषण हल्ल्यांमध्ये खामेनेई आणि त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा खात्मा झाला आहे. इराणी सरकार आणि माध्यमांनी याची पुष्टी केली आहे. परंतु इस्रायलला खामेनेईंच्या अत्यंत गुप्त ठिकाणांची माहिती नेमकी कशी मिळाली असा प्रश्न उपस्थित होतो. अहवालांनुसार, इस्रायलची गुप्तचर संस्था मोसादला इराणच्या सरकारमधूनच खामेनेई यांच्या गुप्त ठिकाणाची माहिती मिळाली होती.
खरे तर खामेनेई यांची सुरक्षेत अत्यंत कडक बंदोबस्त करण्यात आला होता. त्यांना इस्रायली हल्ल्यानंतर तातडीने गुप्त ठिकाणी हलवण्यात आले होते. त्यांच्या गुप्त ठिकाणाची माहिती काही वरिष्ठ सल्लागारांना देण्यात आली होती. परंतु याच सल्लागारांमधील एका अधिकाऱ्याने अचून माहिती इस्रायलच्या मोसादला दिली. माहिती मिळताच इस्रायलने तातडीने हल्ला केला. सध्या या गुप्त अहवालाने जगभरात खळबळ उडाली आहे. मात्र अद्याप अधिकाऱ्याचे नाव स्पष्ट झालेले नसून इराण सरकारडून कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
Ans: दावा केला जात आहे की, इराणच्या सरकारमधीलच एका वरिष्ठ अधिकाऱ्याने खामेनेईंच्या गुप्त ठिकाणाची माहिती इस्रायली गुप्त संस्था मोसादला दिली होती.
Ans: इस्रायलने इराणचे सुप्रीम लीडर खामेनेई यांच्या गुप्त ठिकाणाची माहिती मिळताच इराणवर भीषण हल्ल्यास सुरुवात केली.
Ans: इस्यालने शनिवारी (२८ फेब्रुवारी २०२६) सकाळी इराणची राजधानी तेहरानसह कोम, इस्फाहान, शिराज, तब्रिझ आणि केरमानशाह यांसारख्या प्रमुख शहरांमध्ये एकामागून एक हल्ले केल.






