मधुमेहाच्या रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढू लागली आहे. रक्तात वाढलेल्या साखरेमुळे संपूर्ण शरीराला हानी पोहचते.जीवनशैलीत होणाऱ्या चुका, आहारातील बदल आणि अपुऱ्या झोपेचा परिणाम आरोग्यावर लगेच दिसून येतो. त्यामुळे शरीराची योग्य काळजी घेणे आवश्यक आहे. मधुमेह झाल्यानंतर योग्य वेळी लक्ष न दिल्यास शरीरातील इतर अवयवांना इजा पोहचण्याची शक्यता असते. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी उपाशी पोटी कोणत्या पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील. (फोटो सौजन्य – istock)
रक्तातील साखरेची पातळी कायमच राहील नियंत्रणात! सकाळी उठल्यानंतर उपाशी पोटी करा 'या' पेयांचे सेवन

रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी मेथी दाण्यांचे पाणी प्यावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहते. तसेच मेथी दाण्यांमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते, ज्यामुळे पचनक्रिया सुधारते.

दालचिनीचा वापर मसाले बनवताना केला जातो. यासोबतच सकाळी उठून दालचिनीच्या पाण्याचे सेवन केल्यास रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यासोबतच शरीरातील विषारी घटक बाहेर पडून जातील.

आवळ्यामध्ये विटामिन सी आणि अँटीऑक्सिडंट्स मोठ्या प्रमाणावर आढळून येतात. आवळ्याच्या सेवनामुळे शरीरातील इन्सुलिन स्राव वाढतो. आवळा खाल्ल्यामुळे संपूर्ण शरीराला अनेक फायदे होतात.

वाढलेले वजन कमी करताना नियमित ग्रीन टी चे सेवन केले जाते. उपाशी पोटी ग्रीन टी प्यायल्यास रक्तातील साखर कमी होईल आणि शरीर कायमच निरोगी राहील. यामध्ये असलेले पॉलीफेनॉल, अँटीऑक्सिडंट्स रक्तातील साखर कमी करतात.

मधुमेहाच्या रुग्णांसाठी कारल्याचा रस वरदान ठरतो. त्यामुळे आठवड्यातून दोनदा कारल्याच्या रसाचे सेवन करावे. कारल्याचा रस प्यायल्यामुळे पचनक्रिया निरोगी राहते.






