नवरात्रीचे नऊ रंग सगळेच फॉलो करतात. प्रत्येक दिवशी सुंदर सुंदर कपडे परिधान केले जातात. आज नवरात्री उत्सवाचा तिसरा दिवस असून आजचा रंग निळा आहे.निळ्या रंगाचे कपडे परिधान करण्यासोबतच घरात निळ्या रंगाचे पदार्थ सुद्धा बनवू शकता. निळ्या रंगाचे पदार्थ खायला जितके सुंदर लागतात तितकेच ते दिसायलासुद्धा सुंदर आणि आकर्षित वाटतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला निळ्या रंगाचा कोणते पदार्थ तुम्ही घरी बनवू शकता, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. हे पदार्थ चवीसोबतच आरोग्यासाठी सुद्धा प्रभावी आहेत. (फोटो सौजन्य – istock)
निळ्या रंगाचे 'हे' पदार्थ सगळ्यांचं करतील आकर्षित, दैनंदिन आहारात नियमित करा सेवन
निळ्या रंगाचे अतिशय नाजूक फळ म्हणजे ब्लूबेरी. ब्लूबेरी चवीला अतिशय आंबट गोड असते. हे फळ खाल्ल्यामुळे आरोग्यला अनेक फायदे होतात. त्वचा अतिशय चमकदार राहते.
गोकर्णाच्या फुलांपासून निळ्या रंगाचा चविष्ट आणि हेल्दी चहा बनवला जातो. गोकर्णाची फुले आरोग्यासाठी वरदान ठरतात. मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉलसारख्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी गोकर्णाच्या फुलांचा चहा प्यावा.
चीजकेक लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं खूप जास्त आवडतो. त्यामुळे तुम्ही घरात ब्लूबेरी चीजकेक बनवू शकता.ब्लूबेरी चीजकेक सगळ्यांचं खूप आवडेल.
बाजारात वेगवेगळ्या फ्लेवर्ससोबतच वेगवेगळ्या रंगाचे आईस्क्रीमसुद्धा मिळतात. त्यामुळे घरात लहान मुलांसाठी तुम्ही ब्लूबेरी आईस्क्रीम आणू शकता.
सकाळच्या नाश्त्यात विशेष करून अनेक लोक स्मूदी पितात. स्मूदीचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते आणि आरोग्याला फायदे होतात.