केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या २०२५ च्या अर्थसंकल्पाकडून प्राप्तिकरदात्यांना सर्वाधिक अपेक्षा आहेत. १ फेब्रुवारी २०२५ रोजी अर्थमंत्री देशाचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करणार आहेत. यावर्षीच्या बजेटकडून सर्वसामान्यांसह ते विविध क्षेत्रातील कंपन्यांनादेखील खूपच अपेक्षा आहेत. विशेषतः टॅक्स भरणाऱ्या व्यक्ती या बजेटकडून अधिक अपेक्षा करत आहेत जेणेकरून त्यांना या बजेटकडून अधिक फायदा मिळू शकतो. कशा आणि काय आहेत अपेक्षा जाणून घ्या (फोटो सौजन्य - Instagram/iStock)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२५ चा अर्थसंकल्प सादर करतील. या अर्थसंकल्पात केंद्रीय अर्थमंत्र्यांकडून लोकांना अनेक अपेक्षा आहेत
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण १ फेब्रुवारी रोजी २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठीचा पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची तयारी करत आहेत. अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा हा आठवा अर्थसंकल्प असेल
सीतारमण यांच्या या आठव्या अर्थसंकल्पात आयकर स्लॅबमध्ये मोठे बदल होण्याची अपेक्षा आहे. आर्थिक तज्ज्ञांच्या हवाल्याने माध्यमांमध्ये सर्व प्रकारचे अनुमान लावले जात आहेत
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यावेळी अर्थसंकल्पात आरोग्य क्षेत्राबरोबरच जीडीपी वाढ आणि महागाई कमी करण्यावर विशेष लक्ष देऊ शकतात. यावेळी अर्थसंकल्पात महागाईवर विशेष लक्ष दिले जाईल
देशातील आर्थिक विकासाला गती देण्यासाठी अनेक धोरणे बदलता येतील. याशिवाय शेतकऱ्यांसाठी काही खास घोषणाही केल्या जाऊ शकतात
अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी गेल्या वर्षी नवीन कर प्रणालीअंतर्गत Standard Deduction मर्यादा ५०,००० रुपयांवरून ७५,००० रुपये केली होती. यावर्षीही काही नवीन घोषणा अपेक्षित आहेत
२०२५ च्या अर्थसंकल्पापूर्वी लावल्या जाणाऱ्या अटकळींनुसार, मानक कपातीची मर्यादा ७५ हजार रुपयांवरून १ लाख रुपयांपर्यंत वाढवता येते
२० टक्के कर दर ब्रॅकेटची मर्यादा वाढवण्याबाबत चर्चा सुरू आहे. १२-१५ लाख रुपयांचे उत्पन्न १२-२० लाख रुपयांपर्यंत वाढण्याची शक्यता असल्याचे सांगितले जात आहे