गुढी पाडवा सणाला अवघे काही तास शिल्लक तास शिल्लक राहिले आहेत. गुढी पाडव्याच्या दिवशी अनेक ठिकाणी शोभा यात्रांचे आयोजन केले जाते. याशिवाय महिलांसह पुरुष देखील सुंदर तयार होऊन घरातील गुढीची विधिवत पूजा करतात. हिंदू नवीन वर्षाची सुरुवात गुढी पाडव्यापासून होते. त्यामुळे या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते. सोनं खरेदीसाठी गुढीपाडवा सण अतिशय शुभ मानला जातो. त्यामुळे या दिवशी काहींना काही छोट्या मोठ्या दागिन्यांची खरेदी केली जाते. त्यामुळे आज आम्ही तुम्हाला गुढी पाडव्याला कोणत्या दागिन्यांची खरेदी करावी, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – pinterest)
गुढी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर करा सोन्याची खरेदी
साडी नेसल्यानंतर महिला सोन्याचा किंवा डायमंडचा नेकलेस परिधान करतात. त्यामुळे गुढीपाडव्याच्या दिवशी सुंदर चोकर नेकलेस विकत घेऊ शकता.
सर्वच महिलांच्या हातामध्ये अंगठी हा दागिना असतोच. त्यामुळे तुम्ही व्ही शेप, डायमंड किंवा सोनं, चांदीची अंगठी घेऊ शकता.
बुगडी ला दागिना कानाच्या वरच्या बाजूला घातला जातो. नऊवारी किंवा सहावारी साडी परिधान केल्यानंतर तुम्ही मोत्याची किंवा सोन्याची बुगडी घालू शकता.
कानातले घातल्यामुळे महिलांचा लुक अतिशय सुंदर आणि उठावदार दिसतो. त्यामुळे गुढी पाडव्याच्या दिवशी तुम्ही नाजूक साजूक सुंदर कानातले विकत घेऊ शकता.
महाराष्ट्राचा पारंपारिक दागिना म्हणून नथीला विशेष महत्व आहे. त्यामुळे पाडव्याच्या दिवशी तुम्ही सोनं किंवा मोत्याची नथ खरेदी करू शकता. नाकामध्ये नथ घातल्याशिवाय महिलांचा साज पूर्ण होत नाही.