पावसाळा म्हटलं की पहिले आठवतो तो धबधबा. पहिल्या पावसामुळे वातावरण अल्हाददायी झालेलं असतं. बरेच जण महाबळेश्वर, माळशेज, खंडाळा घाट किंवा जवळपासच्या ठिकाणी पावसातल्या निसर्गाचा आनंद घेण्यासाठी जात असतात. जर तुम्हाला सुद्धा पावसाळ्यात सहलीसाठी बाहेर जायचं असेल तर भारतातल्या या ठिकाणाला नक्की भेट द्या.
पाऊस आणि हिरवाईने नटलेला निसर्ग हा अनेकांना वेड लावतो. असाचं पावसातला निसर्ग अनुभावयचा असल्यास तुम्ही मेघालय ट्रीप करणाऱ्या प्लॅन करु शकता.
मेघालय राज्यातील चेरापुंजी हे खास पावसाळा आणि धबधब्यांसाठी प्रसिद्ध आहे. भारतात सर्वात जास्त पाऊस हा चेरापुंजी येथे होतो.
चेरापुंजीचं वैशिष्ट्यं म्हणजे पावसाचे चारही महिने या ठिकाणी ऊन जराही दिसत नाही.
मुसळधार पावसाने प्रवाहित झालेले धबधबे आणि वटवृक्षांच्या मुळांपासून तयार झालेले पुल हे पर्यटकांना आकर्षित करतं.
निसर्ग सौंदर्याबरोबरच चेरापुंजी हे हस्तकलेसाठी, विशेषतः ऊस आणि बांबूपासून बनवलेल्या वस्तूंसाठी ओळखले जाते.
या भागात खासी आणि जानियास आदिवासी जमाजाच्या लोकांचं वास्तव्य मोठ्या प्रमाणात आहे.
येथील आदिवासी समाज निसर्गपुजेला जास्त महत्व देतात. या ठिकाणी राहणारे आदिवासी पावसाला पवित्र मानतात त्याची पुजा करतात. येथील लोकनृत्य आणि लोककगीतं ही पावसावर आधारित आहे.