महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळा ही सर्वांसाठी एक स्वर्गानुभूती आहे. 18 पगड जातीच्या मराठी लोकांच्या रक्ताने निर्माण झालेलं स्वराज्याचे धनी छत्रपती शिवाजी महाराज हे मंचकावर विराजमान झाले. आज 351 वा शिवराज्याभिषेक दिन साजरा होत आहे. रायगडावर हजारोंच्या संख्येने शिवभक्त दाखल झाले आहेत. भगवा झेंडा हाती घेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयघोषाने अवघा रायगड दुमदुमून गेला आहे. शिवरायांचे वंशज असलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी अभिषेक सोहळ्याला उपस्थिती लावली होती.
Chhatrapati Shivaji Maharaj Shivarajyabhishek ceremony 2025 celebrated at Raigad
महाराष्ट्राचे प्रेरणास्थान असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहामध्ये पार पडला आहे.
यंदाच्या वर्षी छत्रपती शिवाजी महाराजांचा 352 वा राज्याभिषेक सोहळा होता. यावेळी रायगडावर मोठा दिमाखदार सोहळा पार पडला आहे.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीला फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली होती. तसेच फुलांच्या पायघड्या घालण्यात आल्या आहेत.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असलेले माजी खासदार संभाजीराजे छत्रपती आणि त्यांचे पुत्र शहाजीराजे छत्रपती उपस्थित होते.
यावेळी गडावर मोठे उत्साहपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पतका आणि झेंडा मिरवून गौरवपूर्ण इतिहासाचे स्मरण करण्यात आले.
महिलांनी देखील पारंपरिक वेशभूषा करुन सहभाग घेतला. साहसी खेळ आणि लेझीम खेळत हा सोहळा साजरा झाला.
पहिला शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून १६७४ रोजी (ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, शालिवाहन शके १५९६) रायगड किल्ल्यावर पार पडला होता. यानंतर आता रायगडावर दरवर्षी मोठ्या उत्साहात हा सोहळा साजरा केला जातो.
शिवराज्याभिषेक दिनाच्या निमित्ताने लाखो शिवभक्त रायगडावर दाखल होतात. यावेळी भगवा झेंडा हाती धरुन अवघा परिसर शिवाजी महाराजांच्या जयघोषाने दुमदुमून जातो.