शरीरामध्ये जीवनसत्त्वांची कमतरता निर्माण झाल्यानंतर आरोग्यासंबंधित अनेक समस्या उद्भवतात. शरीराच्या वाढीसाठी आणि मजबूत हाडांसाठी आहारात पौष्टिक पदार्थांचे सेवन करणे गरजेचे आहे. अनेकदा शरीरामध्ये युरिक अॅसिडची समस्या जाणवू लागल्यानंतर आरोग्य बिघडण्यास सुरुवात होते. शरीरातील विषारी द्रव बाहेर पडून गेले नाहीतर युरिक अॅसिडचा त्रास होण्यास सुरुवात होते. युरिक अॅसिड हा एक निरुपयोगी पदार्थ असून रक्तामध्ये तयार होतो. रक्तातील युरिक अॅसिडची पातळी वाढल्यानंतर संधिवात किडनी स्टोन इत्यादी आजार होण्याची शक्यता असते. त्यामुळे प्युरीन युक्त पदार्थांचे सेवन करू नये. आज आम्ही तुम्हाला युरिक अॅसिडची समस्या असलेल्या कोणत्या भाज्यांचे सेवन करू नये, याबद्दल सांगणार आहोत (फोटो सौजन्य-istock)
आहारात करू नका 'या' भाज्यांचे सेवन
युरिक अॅसिडचा त्रास असलेल्या लोकांनी भेंडीच्या भाजीचे सेवन करू नये. कारण भेंडीमध्ये जास्त प्रमाणात प्युरीन असते. भेंडीमध्ये ऑक्सलेट हा एक नैसर्गिक पदार्थ आढळून येतो.
संधिवात किंवा युरिक अॅसिडचा त्रास असल्यास टोमॅटो खाऊ नये. यामुळे संधिरोगाचे प्रमाण वाढत जाते आणि आरोग्य बिघडू लागते.
पालकच्या भाजीमध्ये जास्त प्रमाणात प्युरीन असते. पालक खाल्यानंतर पालकाचे रूपांतर युरिक अॅसिडमध्ये होते. त्यामुळे कमीत कमी प्रमाणात पालकच्या भाजीचे सेवन करावे.
युरिक अॅसिडचा त्रास असलेल्यांनी नियमित बीटरूट खाऊ नये. संधिरोग हा रक्तातील युरिक अॅसिडच्या वाढीव पातळीवर परिणाम करतो.
संधिवाताचा त्रास असलेल्या लोकांनी मशरूम खाऊ नाय. मशरूम खाल्ल्यामुळे रक्तातील प्युरीन वाढू लागते. नियमित मशरूम खाल्यामुळे सांध्यांभोवती युरिक अॅसिड जमा होते.