सकाळी उठल्यानंतर दिवसाची सुरुवात हेल्दी पदार्थानी झाली तर संपूर्ण दिवस आनंदात जातो. अशावेळी नाश्त्यासाठी उत्तम पर्याय म्हणजे मुसली. यामध्ये फायबर, प्रथिने आणि इतर पोषक घटक मोठ्या प्रमाणात आढळून येतात. मुसलीचे सेवन केल्यामुळे शरीराला ऊर्जा मिळण्यासोबतच शरीर निरोगी सुद्धा राहते. मुसली तयार करणे अतिशय सोपे आहे. यामध्ये तुम्ही वेगवेगळी फळे टाकून त्यांचे सेवन करू शकता. अनेक लोक वाढलेले वजन कमी करण्यासाठी मुसलीचे सेवन करतात. पण या पदार्थाच्या सेवनामुळे शरीराला इतरही अनेक वेगवेगळे फायदे होतात.(फोटो सौजन्य – iStock)
रोजच्या नाश्त्यात करा Muesli चे सेवन, हृदयासोबत शरीराला होतील आश्चर्यकारक फायदे
रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात मुसली खावी. यामध्ये नैसर्गिक साखर आणि कार्बोहायड्रेट्स आढळून येतात. ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहते.
शरीरात वाढलेले खराब कोलेस्ट्रॉल नियंत्रणात ठेवण्यासाठी दैनंदिन आहारात मुसलीचे सेवन करावे. यामुळे हृदयाचे आरोग्य निरोगी राहते आणि हृद्य विकाराचा धोका कमी होतो.
सकाळच्या घाईगडबडीमध्ये अनेकदा काय बनवावं? हे सुचत नाही. अशावेळी तुम्ही मुसलीचे सेवन करावे. हा पदार्थ कमीत कमी साहित्यामध्ये झटपट तयार होतो. मुस्लीमध्ये कार्बोहायड्रेट्स, निरोगी चरबी आणि प्रथिने आढळून येतात.
मुसलीमध्ये भरपूर प्रमाणात फायबर आढळून येते. त्यामुळे दैनंदिन आहारात फायबर असलेल्या पदार्थांचे अधिक सेवन करावे. हे पदार्थ पचनासाठी अतिशय हलके आहेत. यामुळे बिघडलेली पचनक्रिया सुधारण्यास मदत होते.
वाढलेले वजन कमी करण्यासाठी सकाळच्या नाश्त्यात तुम्ही मुसलीचे सेवन करू शकता. यामुळे वजन नियंत्रणात राहील. मुसली खाल्यामुळे पोट दीर्घकाळ भरलेले राहते आणि आरोग्य सुधारते.