दिवाळीनिमित्त सर्वच घरांमध्ये अनेक गोडाचे आणि फराळातील पदार्थ बनवले जातात. चकली, लाडू, चिवडा, मिठाई इत्यादी अनेक वेगवेगळ्या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीराला हानी पोहचण्याची शक्यता असते. अतिगोड पदार्थांचे सेवन केल्यामुळे मधुमेह किंवा कोलेस्ट्रॉलचा धोका वाढतो. त्यामुळे दिवाळीतील पदार्थांचे सेवन केल्यानंतर शरीर आतून स्वच्छ होणे सुद्धा तितकेच आवश्यक आहे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला उपाशी पोटी कोणत्या डिटॉक्स पेयांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे शरीराला भरमसाट फायदे होतात. (फोटो सौजन्य – istock)
दिवाळीनंतर 'या' डिटॉक्स पेयांचे नियमित करा सेवन, आतड्या आणि संपूर्ण शरीरातील घाण होईल स्वच्छ
दिवाळीनंतर बऱ्याचदा घसा खवखवणे किंवा इन्फेक्शनचा धोका वाढू लागतो. हे इन्फेक्शन कमी करण्यासाठी आल्याच्या पाण्याचे सेवन करावे. आळ्यामध्ये असलेले दाहक विरोधी गुणधर्म शरीर स्वच्छ ठेवतात.
सफरचंद सायडर व्हिनेगरचे सेवन केल्यास रक्तात वाढलेली साखर नियंत्रणात राहील आणि शरीराला अनेक फायदे होतील. सफरचंद सायडर व्हिनेगर कोमट पाण्यात मिक्स करून प्यावे.
शरीरासाठी काकडी आणि पुदिना हे दोन पदार्थ अतिशय प्रभावी ठरतात. रात्री झोपण्याधी पाण्यात काकडी आणि पुदिन्याची पाने टाकून रात्रभर तसेच ठेवा. त्यानंतर सकाळी उठून पाण्याचे सेवन केल्यास शरीरातील घाण बाहेर पडून जाईल.
आयुर्वेदामध्ये जिरं आणि ओव्याचे पाणी शरीरासाठी अमृत मानले जाते. कारण यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असते, ज्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यामुळे पोटातील वायू, ऍसिडिटी नियंत्रणात राहते.
शरीर डिटॉक्स करण्यासाठी नियमित कोमट पाण्यात लिंबाचा रस आणि काळे मीठ मिक्स करून प्यावे. यामुळे आतड्यांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडून जाईल आणि शरीर स्वच्छ होईल.