पावसाळ्याच्या दिवसांमध्ये पोटाच्या समस्या वाढू लागतात. कारण दूषित पाणी, जंक फूडचे सेवन, आहारात होणारे बदल इत्यादी अनेक गोष्टींचा परिणाम आरोग्यावर झाल्यानंतर पोटाच्या समस्या वाढू लागतात. यामुळे पोटात दुखणे, पोट फुगणे, मळमळ, उलट्या इत्यादी अनेक लक्षणे शरीरात दिसू लागतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला तुम्हाला रोगप्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि पोटाच्या समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी कोणत्या पेयांचे सकाळच्या नाश्त्यात सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या पेयांच्या सेवनामुळे पोटासंबंधित समस्यांपासून कायमची सुटका मिळेल आणि तुम्ही निरोगी राहाल. (फोटो सौजन्य – istock)
पोटाच्या सर्वच समस्यांपासून आराम मिळवण्यासाठी नाश्त्यात करा 'या' पेयांचे सेवन
सकाळी उठल्यानंतर ग्रीन टी चे सेवन केल्यास पोटात साचून राहिलेले विषारी घटक बाहेर पडून जातील. तसेच ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट आढळून येते, ज्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते.
सोशल मीडियावर माचा टी प्रचंड व्हायरल होत आहे. हा चहा ग्रीन टी प्रमाणेच असतो. माचामध्ये ग्रीन टीपेक्षा जास्त अँटीऑक्सिडंट्स आणि पोषक घटक आढळून येतात. या चहाचे सेवन केल्यामुळे मानसिक तणाव कमी होतो.
अनेकांच्या दिवसाची सुरुवात काळ्या चहाचे सेवन करू होते. सकाळी उठल्यानंतर दुधाचा चहा पिण्याऐवजी काळ्या चहाचे सेवन करावे. या चहाच्या सेवनामुळे पोटात ऍसिडिटी किंवा इतर समस्या वाढत नाहीत.
पुदिन्याच्या पानांपासून तयार केलेला चहा पोटात वाढलेली उष्णता कमी करण्यास मदत करतो. यामध्ये असलेले मेन्थॉल पोटाच्या स्नायूंना आराम देतात. तसेच आतड्यांच्या हालचाली सुरळीत होतात.
पोटासंबंधित समस्या उद्भवू लागल्यानंतर दुधाच्या चहाचे आजिबात सेवन करू नये.याऐवजी दालचिनीच्या चहाचे सेवन केल्यास पोटात वाढलेला दाह कमी होण्यास मदत होईल.