हल्ली डिजिटल युगात अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मोबाईल, लॅपटॉप, कम्प्युटर इत्यादीचा मोठ्या प्रमाणावर वापर करतात. मात्र सतत मोबाईल किंवा टीव्ही पाहत राहिल्यामुळे डोळ्यांचे आरोग्य खराब होण्याची जास्त शक्यता असते. डोळ्यांची दृष्टी कमकुवत झाल्यानंतर लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं चष्मा लागला आहे. मात्र हल्लीची मुलं चष्मा लावण्यास नकार देतात. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला डोळ्यांची कमकुवत झालेली दृष्टी सुधारण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. (फोटो सौजन्य – iStock)
कमी वयात डोळ्यांची कमकुवत झाली दृष्टी सुधारण्यासाठी आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
डोळ्यांचे बिघडलेले आरोग्य सुधारण्यासाठी आहारात गाजर खावे. गाजर खाल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात. यामध्ये आढळून येणारे बीटा-कॅरोटीन आणि विटामिन ए डोळ्यांचा रेटिना मजबूत ठेवण्यास मदत करतो.
सकाळी उठल्यानंतर नियमित भिजवलेले बदाम खावे. बदाम आणि सूर्यफुलाच्या बियांचे सेवन केल्यामुळे डोळ्यांची दृष्टी निरोगी राहते आणि रेटिना मजबूत राहतो.
डोळ्यांची कमकुवत झालेली दृष्टी सुधारण्यासाठी आहारात सॅल्मन माशाचे सेवन करावे. हा मासा बाजारात सहज उपलब्ध होतो. डोळ्यांवर वाढलेला कोरडेपणा कमी करण्यासाठी सॅल्मन मासा खावा.
लहान मुलांपासून अगदी मोठ्यांपर्यंत सगळ्यांचं रताळी खायला खूप आवडतात. रताळ्यांचे सेवन केल्यामुळे वृद्धत्वासंबंधित समस्या दूर होतात आणि डोळ्यांचे आरोग्य निरोगी राहते.
विटामिन सी युक्त डोळ्यांच्या आरोग्यासाठी अतिशय पौष्टिक मानला जातो. डोळ्यांची कमकुवत झालेली दृष्टी सुधारण्यासाठी रेटिना मजबूत करण्यासाठी आवळ्याचे किंवा आवळ्याच्या पावडरचे सेवन करावे.