जगभरात मधुमेहाच्या रुग्ण संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. यामुळे शरीराच्या इतर अवयवांना हानी पोहचते. त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढल्यानंतर शरीरात दिसून येणारी लक्षणांकडे दुर्लक्ष न करता तातडीने डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य ते उपचार करावे. यामुळे शरीराला कोणतीही हानी पोहचणार नाही. मधुमेह झाल्यानंतर रक्तातील साखरेचे प्रमाण झपाट्याने वाढू लागते. हे प्रमाण वाढू नये म्हणून आहारात या पदार्थांचे नियमित सेवन करावे. यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. यासोबतच रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते. (फोटो सौजन्य – iStock)
Diabetes नियंत्रणात ठेवण्यासाठी रोजच्या आहारात करा 'या' पदार्थांचे सेवन
मधुमेह झालेल्या रुग्णांसाठी कराल भाजी वरदान ठरते. कारण यामध्ये असलेले पोषक घटक रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करतात. याशिवाय कराल खाल्यामुळे शरीराची पचनक्रिया सुधारते.
ओट्समध्ये ग्लायसेमिक इंडेक्स कमी असते, त्यामुळे मधुमेह असलेल्या रुग्णांनी सकाळच्या नाश्त्यात ओट्सचे सेवन करावे. यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहील.
काकडी शरीर थंड करते. यामध्ये ९५ टक्के पाणी असते. मधुमेह झाल्यानंतर रोजच्या आहारात नियमित काकडी किंवा काकडीच्या रसाचे सेवन करावे. यामुळे शरीर हायड्रेट राहते.
बेरीमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात. यामुळे इन्सुलिनचा प्रतिरोध कमी होण्यास मदत होते. सकाळच्या नाश्त्यात ताज्या फळांचे सेवन केल्यामुळे आरोग्याला अनेक फायदे होतात.
दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी आढळून येते. त्यामुळे रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी दुधी भोपळ्याच्या रसाचे सेवन करावे.यामुळे शरीर हायड्रेट राहते.