उन्हाळ्यात शरीरावर वाढलेली चरबी कमी करण्यासाठी अनेक लोक आहारात प्रोटीनशेक किंवा तासनतास जिममध्ये जाऊन व्यायाम करतात. मात्र या सगळ्याचा शरीरावर कोणताच परिणाम दिसून येत नाही. चुकीचा डाएट फॉलो केल्यामुळे वाढलेली चरबी कमी होण्याऐवजी आणखीनच वाढू लागते. अशावेळी आहारात पचनास हलक्या आणि पौष्टिक पदार्थांचे सेवन करावे. आज आम्ही तुम्हाला वाढलेले वजन कमी करताना आहारात कोणत्या फळांचे नियमित सेवन करावे, याबद्दल सविस्तर माहिती सांगणार आहोत. या फळांच्या सेवनामुळे शरीरावरील चरबी कमी होण्यासोबतच आरोग्यालासुद्धा फायदे होतील.(फोटो सौजन्य – iStock)
उन्हाळ्यात रोजच्या आहारात करा 'या' फळांचे सेवन, दिसाल स्लिम
चवीला आंबट गोड असलेले किवी हे फळ सगळ्यांचं खायला खूप आवडते. किवीचे सेवन केल्यामुळे शरीरातील कमी झालेल्या पांढऱ्या पेशी वाढतात. तसेच मेटाबॉलिज्म सुधारते आणि वजन कमी होण्यास मदत होते.
चवीला गोड लागणारे टरबूज सगळेच जण आवडीने खातात. उन्हाळा सुरु झाल्यानंतर बाजारात टरबूज दिसू लागतात. यामध्ये असलेले गुणधर्म वाढलेले वजन कमी करण्यासाठी मदत होते .
विटामिन सी युक्त संत्र्यांचे रोजच्या आहारात नियमित सेवन करावे. संत्र खाल्यामुळे आरोग्यासह त्वचेला अनेक फायदे होतात. याशिवाय रक्तातील साखरेची प[पातळी नियंत्रणात राहण्यास मदत होते.
एप्रिल महिन्याला सुरुवात झाल्यानंतर सगळ्यात आधी आठवण येणारे फळ म्हणजे आंबा. लहान मुलांपासून ते अगदी मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांचं आंबा खायला खूप आवडतो. आंब्याचे सेवन केल्यामुळे वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते.
उन्हाळ्यात बाजारात मोठ्या प्रमाणात कलिंगड उपलब्ध असतात. कलिंगड खाल्यामुळे शरीरात थंडावा कायम टिकून राहतो आणि वजन कमी होण्यास मदत होते.यामध्ये विटामिन ए, बी 6, सी, अमिनो ऍसिड आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळून येते.